Omraje Nimbalkar on Tanaji Sawanat : कामाला स्थगिती देणारेच विचारत आहेत काय केले म्हणून

Lok Sabha Election 2024 : आधी तुमचा उमेदवार तरी फायनल करा म्हणावे, योग्य वेळी बोलेन
Omraje Nimbalkar,Tanaji Sawant
Omraje Nimbalkar,Tanaji Sawantsarkarnama
Published on
Updated on

शितल वाघमारे

Dharashiv : लोकं ठरवतील काय आणलंय काय नाही आणलंय. मी कार्यक्षम आहे का अकार्यक्षम आहे. ते मतदार आहेत, ते ठरवतील. काय नाही आणलंय. आधी तुमचा उमेदवार तरी फायनल करा. योग्य वेळी बोलन जे काही बोलायचे ते. माझ्या कामाला स्थगिती देणारेच आज विचारत आहेत काय केले म्हणून असे प्रत्युत्तर खासदारओमराजे निंबाळकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रातली आपण एक आणलेली योजना दाखवा. म्हणेल ती पैज हरायला तयार आहे, असे आव्हान राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी रविवारी (ता.14) ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिले होते. त्याला ओमराजे यांनी उत्तर दिले.

Omraje Nimbalkar,Tanaji Sawant
Mahayuti Melva : धाराशिव महायुतीच्या मेळाव्यात 'असमन्वय'; शिंदेच्या इच्छुक नेत्याला...

पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव, सूरत -चेन्नई ग्रीन फिल्ड, आरडीएसएस विद्युतीकरण योजना, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग या सगळ्या प्रोसिडिंग आहेत माझ्याकडे. मी खासदार म्हणून काय काय केले ते सगळ्या जनतेला ठाऊक आहे. आपल्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे सगळे खासदार आहेत. त्यांना विचारायला हवे.’

‘मी जे काम केले आहे ते दिसणार आहे. जी काही काम केली ती प्रत्यक्ष ग्राऊंडवर आहेत. मी 24 तास लोकांच्या संपर्कात आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. लोकाकडे जे प्रचंड पैसे आहेत. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. गोरगरिबांची कामे करतो. जे पूर्वीचे खासदार झालेत त्यांनी काय केले होते ते नागरिकांना माहिती आहे. मी काय केले हे देखील माहिती आहे. आमदाराचा मतदारसंघ हा एक दोन तालुक्यांचा असतो. खासदाराचा मतदारसंघ हा 11 तालुक्यांचा आहे’, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘मी कोरोना काळात सगळीकडे कामे केली आहेत. सामान्य लोकांना माझ्या कामाबदल मी काय काम करतो मी किती कार्यक्षम आहे, की अकार्यक्षम आहे ते माहिती आहे. मी विरोधी पक्षात असतानाही कामे केली आहेत. सत्तांतर झाल्याच्या नंतर ज्या ज्या कामाला स्थगिती दिली गेली, ती स्थगिती लवकर उठवल्या गेली असतील तर लोकांचा त्रास वाचला असता’, असेही ओमराजे यांनी नमूद केले. न्यायालयात जाऊन आपण स्थगिती उठविली. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांची काळजी सर्वांना असायला हवी. सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करण्यापेक्षा सर्वांनीच हे करावे असेही ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

Omraje Nimbalkar,Tanaji Sawant
Osmanabad to Dharashiv Politics : उस्मानाबाद ते धाराशिव; आधी विलासराव देशमुखांनी रद्द केला आणि आता केंद्र सरकारची मंजुरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com