Jaydatta Kshirsagar News: एक पुतण्या शरद पवारांसोबत तर दुसरा अजितदादांकडे; जयदत्त क्षीरसागर लागले कामाला..

Marathwada Political News : राष्ट्रवादीत असताना त्यांची प्रमुख ओबीसी नेते अशी ओळख होती.
Jaydatta Kshirsagar News
Jaydatta Kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : ओबीसीचे मास लिडर अशी ओळख असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना सहा वर्षांपूर्वी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी आव्हान दिले आणि आता दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी साथ सोडली. यानंतर आतापर्यंत काहीशे शांत असलेले क्षीरसागर चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसत आहे. समर्थकांच्या बैठका - सभांवर त्यांनी जोर दिला आहे.

Jaydatta Kshirsagar News
Imtiaz Jaleel On Co-Operative Bank: आणखी एक बॅंक बुडाली, आता तरी ग्राहकांच्या पैशाची हमी द्या..

दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचे पुत्र असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी विधीमंडळातील त्यांचा राजकीय वारसा सुरु केला. पंचायत समिती सभापती, उपमंत्री, राज्यमंत्री आणि विविध महत्वाच्या खात्यांचे कॅबीनेट मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहीलेली आहे. (Beed News) चार वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व करताना त्यांनी बीडसह तत्कालिन चौसाळा मतदार संघातून देखील विजय मिळविला आहे.

राष्ट्रवादीत असताना त्यांची प्रमुख ओबीसी नेते अशी ओळख होती. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांना आव्हान दिले. (Marathwada) विधानसभा निवडणुकीत देखील चुलत्या - पुतण्यांच्या लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला. यापूर्वी पराभवानंतरही माजी मंत्री क्षीरसागर दुसऱ्या दिवशी कामाला लागल्याचे सर्वांना माहित आहे.

मात्र, २०१९ च्या पराभवानंतर त्यांचा मतदारसंघातील संपर्क तुलनेने कमी झाला. परिणामी ४० वर्षांपासून ताब्यात असलेली बाजार समितीही त्यांच्या हातून गेली. बीड शहराची राजकीय धुरा त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर सांभाळत असल्याने ते शहरात राजकीय दृष्ट्या हस्तक्षेत कमीच ठेवत. भारतभूषण क्षीरसागर यांची काठी त्यांचे चिरंजीव योगेश यांनी हाती घेतली. नव्या राजकीय समिकरणात सोबत सहभागी होण्यचा पुतणे योगेश क्षीरसागर यांचा प्रस्ताव त्यांनी नाकारल्याने त्यांनी कांकाची साथ सोडली. त्यामुळे आता `आपले आपणच` हे स्पष्ट झाल्याने जयदत्त क्षीरसागर कामाला लागल्याचे दिसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेच्या दिवशीच त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांची एकत्रित सर्वसाधारण सभा घेऊन समर्थकांशी हितगुज केली. `लढेंगे और जितेंगे भी`,असा नारा देत समर्थकांना स्फुर्ती दिली. त्यानंतर शहरातही त्यांनी लक्ष घातले आहे. भाजप - शिवसेनेशी जवळकीमुळे मुस्लिम समाज त्यांच्यापासून दुरावत असल्याचे चित्र होते. या समाजातील प्रमुखांची बैठक घेऊन त्यांनाही क्षीरसागरांनी साद घातली आहे. शहरातील व मतदारसंघातील विविध घटकांशी ते संवादही साधत आहेत. आगामी विधानसभा लढणारच असल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com