पांडेय शब्द पाळणार ; स्मार्ट सिटीत पदवीधर तृतीयपंथीयांना नोकरीची संधी

पहिल्या टप्प्यात ठरावीक जणांची नियुक्ती केली जाणार असल्यामुळे या दहा जणांच्या मुलाखती घेऊन त्यातून निवड केली जाईल. ( Municipal Corporation)
Astikkumar Pandey, Aurangabad
Astikkumar Pandey, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीयांना स्मार्ट सिटीत नोकरी देण्याचा निर्णय महापालिकेचे (Municipal Corporation) प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला होता. त्यानुसार पात्र तृतीयपंथीयांचा काही महिन्यांपासून शोध सुरू होता. (Aurangabad) दहा जण पदवीधर तृतीयपंथीयांनी संपर्क साधला असून, लवकरच त्यांची कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या जनजागृतीसाठी नियुक्ती केली जाणार आहे. (Marathwada)

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहर बससेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यात शहरातील तृतीयपंथीयांना समावून घेण्याचा निर्णय पांडेय यांनी जाहीर केला होता.

त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुकही झाले, पण तृतीयपंथीयांची निवड करताना अनेक अडचणी येत होत्या. मे २०२१ अखेरपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा पांडेय यांचा मानस होता. दरम्यान शहरात असलेल्या ५०० पेक्षा जास्त तृतीयपंथीयांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी त्यांच्या संघटनांशी संपर्क साधण्यात आला. त्यातून दहा जण पदवीधारक असल्याचे समोर आले आहे.

पहिल्या टप्प्यात ठरावीक जणांची नियुक्ती केली जाणार असल्यामुळे या दहा जणांच्या मुलाखती घेऊन त्यातून निवड केली जाईल. लवकरच ही फाईल सीईओ पांडेय यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद यांनी सांगितले.

Astikkumar Pandey, Aurangabad
आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील डबल डेकर औरंगाबादेत दीड वर्षांनी धावणार..

स्मार्ट सिटी अभियानामार्फत सुरू असलेल्या बससेवेसाठी तृतीयपंथीयांची निवड केली जाणार होती. पण सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याची गरज असल्यामुळे या मोहिमेच्या जनजागृतीसाठी त्यांचा वापर केला जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com