Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येत आहे. मात्र, असे अर्ज दाखल करून मराठा समाजाच्या शक्तीचे विभाजन होईल. त्यामुळे एकच अपक्ष उमेदवार देऊन त्याला निवडून आणा, किंवा सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देईल, त्या उमेदवाराकडून बॉण्ड लिहून घ्या आणि निवडणुकीत त्याला पाठिंबा द्या, असे दोन पर्याय मराठा समाजापुढे ठेवत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मी निवडणुकीच्या भानगडीत पडणार नाही, असे स्पष्ट केले. Pankaja Munde On Manoj Jarange
जरांगे पटालांच्या या भूमिकेचे स्वागत करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) त्यांचे अभिनंदन केले आहे. मुंडे म्हणाल्या, जरांगे पाटील यांना राजकारण करायचे नाही, हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झालेले आहे. राज्यातील मराठा समाजाचे आंदोलन त्यांनी सावरले. ते पहिल्यापासून राजकीय भूमिकेपासून दूर होते. आता लोकसभेच्या निवडणुकीतही ते आपल्या अराजकीय भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांचे अभिंनंदन करते, असे मुंडेंनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला 50 टक्क्यांतच आरक्षण (Maratha Reservation) द्यावे, सगेसोयऱ्यांबाबत कायदा करावा, अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली आहे. सरकारने मात्र 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिले. सरकारच्या या भूमिकेविरोधात आक्रमक झालेल्या मनोज जरांगेंनी रविवारी (ता. 24) आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या महासभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी सगेसोयरेवर आपण ठाम असून आचारसंहिता संपल्यानंतर मराठा-कुणबी एकच असल्याचा जीआर काढावा, आवाहन सरकारला केले आहे.
जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, मी लोकसभा निवडणूक लढवणाच्या भानगडीत पडणार नाही. तसेच निवडणुकीत गावागावांतून उमेदवार दिला तर समाजाचे नुकसान होईल. त्यामुळे एकच अपक्ष उमेदवार उभा करावा. अन्यथा जो कोणी सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देईल, तसे बॉण्डवर लिहून देणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या, असे दोन पर्याय जरांगेंनी समाजापुढे ठेवले. तसेच हा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक गावात बैठक घेऊन अंतिम निर्णय 30 मार्चपर्यंत कळवावा, असेगी आवाहन त्यांनी केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.