Pankaja Munde Dasara Melava : 'कारखान्यासाठी लोकांनी ११ कोटी जमवले, पण...'; पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?

Pankaja Munde Dasara Melava 2023 : "जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही..."
Pankaja Munde Dasara Melava
Pankaja Munde Dasara MelavaSarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde Dasara Melava 2023 : राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगड येथे आज (मंगळवारी) भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा परंपरागत दसरा मेळावा पार पडला. या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांनी साखर कारखान्यासाठी जमवलेल्या निधीवरही त्यांनी विधान केले आहे. (Latest Marathi News)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये समाजातील सर्व घटकांच्या लोकांनी माझं स्वागत केलं आहे. या मेळाव्यात गर्दींच्या संख्येचं सीमोल्लंघन केले आहे. या सर्वांसाठी मी सर्वांचं आभार मानते, मी शिवशक्ती परिक्रमा केली. तेव्हा मला वाटतच नाही की, राजाच्या कानाकोपऱ्यात इतकं जास्त प्रेम, माया मिळेल. माझ्या कातड्याचे जोडे केले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत.

"माझ्या साखर कारखान्यावर धाडी टाकण्यात आल्या, त्यावेळी तुम्ही दोन दिवसांत मला ११ कोटी रुपये जमवून दिलात. मी लोकांकडून पैसे उसने घेतले नाहीत, माझ्यासाठी लोकांचे आशीर्वादाच पुरेसे आहेत. तुम्ही जे काही पैसे गोळा ते मी घेणार नाही, असं मी माझ्या मुलाला सांगितलं आहे. मी आपल्याला स्वाभिमान देऊ शकते," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

"माझा आपला माणूस उन्हातान्हात उभा असेल, तर सत्तेच्या खुर्चीत सावलीत बसणाऱ्यांचं रक्त हे गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. नुसतं जिंकता यावं यासाठी तुम्ही निष्ठा गहान ठेवू शकत नाही. राजकारण करत असताना माझ्या लोकांचं हित मला साधता आलं पाहिजे. जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही," असेही मुंडे म्हणाल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com