Pankaja Munde On GST Raid : अचानक जीएसटीची धाड पडल्याने पंकजा मुंडे आश्चर्यचकित..

Sugar Factory : कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद असून जीएसटीचे पैसे भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत
Pankaja Munde On GST Raid News
Pankaja Munde On GST Raid NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed : परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर आज जीएसटी (GST Raid) विभागाने छापा टाकला. विशेष म्हणजे या छाप्याची कल्पना कुणालाच नव्हती. पंकजा मुंडे गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात असतांना त्यांना या धाडीची माहिती फोनवरून कळाली. या कारवाईनंतर माध्यमांशी बोलतांना पकंजा मुंडे यांनी करावाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Pankaja Munde On GST Raid News
Pankaja Munde News: मोठी बातमी! भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

जीएसटीसह इतर प्रश्नावर महिनाभरापुर्वीच माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांच्यासोबत चर्चा झाली होती. कारखाना कोणत्या परिस्थितीत आम्ही चालवत आहोत, याची कल्पना देत त्यांना पर्याय काढण्याची विनंती केली होती. (Sugar Factory) त्यानंतर अचानक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला याचे आश्चर्य वाटते. आम्ही चौकशीला सहकार्य करत असून जीएसटीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कागदपत्र दिली आहेत, असेही पंकजा यांनी सांगितले.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, या कारखान्याच्या जीएसटीबद्दलचा आमचा अंतर्गत वाद सुरु आहे. तो माध्यमांपर्यंत जाण्याचं काही कारण नव्हतं. (Bjp) मात्र आज अचानक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. मीदेखील अधिकाऱ्यांशी बोलले, पण अर्जंट कारवाई करण्याचे वरून आदेश होते, असे मला त्यांनी सांगितले.

जीएसटी कार्यालयाकडून ही बातमी माध्यमांपर्यंत आधी पोहोचल्याचेही मला कळले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सहा-सात वर्षांपासून आम्ही तो नुकसानीत चालवत होतो. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी याच कारणाने भेट घेतली होती.

आम्हाला जीएसटी भरायचाय, कर्ज फेडायचे आहे हे सांगितले होते. वैद्यनाथसह इतर पाच-सहा आजारी साखर कारखान्यांना मदत करा, अशी विनंती आम्ही केली होती. कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद असून जीएसटीचे पैसे भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही पंकजा यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com