Pankaja Munde News : 'धनंजय सोबत नव्हता तेव्हाही जिंकलो, आता फार फरक नाही...'; काय बोलून गेल्या पंकजा मुंडे?

Pankaja Munde Statement on Dhananjay Munde : जरी कठीण प्रवास असला तरी आम्ही विजय मिळवला होता.
Pankaja Munde Statement on Dhananjay Munde
Pankaja Munde Statement on Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे भाष्य केले आहे. राज्याच्या सरकारमध्ये आणि महायुतीत तीन महत्त्वाची पक्ष असताना यंदाची बीडची लोकसभा निवडणुकीचे आणि मतदारांचे गणित याबाबत मुंडे प्रतिक्रिया दिली आहे. बंधू धनंजय सोबत नव्हता तेव्हाही लोकसभा जिंकलीच होती, आता सोबत आहे तर फार फरक पडणार नाही, असे मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde News)

Pankaja Munde Statement on Dhananjay Munde
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण; हायकोर्टाची शरद पवार गटाला नोटीस

एका वृत्तवाहिनीशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. या वेळी त्यांना, 'धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्र आला आहात, महायुतीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आता एकत्र आहात. यामुळे ही लोकसभा निवडणूक सहज जाईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, "धनंजय मुंडे सोबत नसतानाही निवडणूक सहजच होती. जरी कठीण प्रवास असला तरी आम्ही विजय मिळवला होता. खरंतर लोकसभेचा जो मतदार आहे, त्यामध्ये बंधू धनंजय (Dhanajay Munde) सोबत आला म्हणून त्यात अधिकची वाढ होईल असं वाटत नाही. मतदानाच्या वितरणात फार काही फरक पडणार नाही. मात्र, आता एकत्र आलो आहेत तर बघूया काय फरक पडतो. आम्ही सकारात्मक विचार करतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde Statement on Dhananjay Munde
Pankaja Munde News : 'पंकजा मुंडेंची लोकप्रियता फडणवीसांपेक्षा काकणभर अधिकच; त्यांनी भाजप सोडून...'; कुणी दिली ऑफर?

फेटा घालण्याची हिंमत नाही -

"चांगल्या विचाराला खतपाणी घालणं ही काळाची गरज आहे. मी सांगितलं होतं की ओबीसींचं आरक्षण सुरक्षित झाल्याशिवाय मी हार घालणार नाही. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला. त्यानंतर लोकांनी हार घालायला सुरुवात केली, पण सध्या समाजात निर्माण झालेली परिस्थिती पाहून मला फेटा घालण्याची इच्छा होत नाही. फेटा घालायला लागणारा स्वाभिमान माझ्यामध्ये असेल, पण मनामधील चिंता जोपर्यंत संपत नाही, समाजा-समाजात उभा राहिलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही, तो पर्यंत फेटा घालण्याची आपली इच्छा नाही. जेव्हा सर्व जाती धर्माचे लोकं एका छताखाली सुखाने नांदतील तेव्हा आपण फेटा घालू", असंही त्या म्हणाल्या.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com