Pankaja Munde : ऐन डिसेंबरमध्ये उकाडा का वाढला; पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

Parali Shasan Aplya Dari : संविधानिक पद नाही, मात्र परळीची कन्या म्हणून कार्यक्रमाला उपस्थित
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात अखेर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा मुहूर्त लागला. या निमित्त परळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच हेलिकॉप्टरमधून आल्याने जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरला. हा धागा आणि वातावरणातील गरमीची सांगड घालून पंकजा मुंडेंनी कार्यक्रमात मिश्किल टिपण्णी केली.

राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ऐन हिवळ्यात उकाडा निर्माण झाला आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'लोक म्हणत आहेत की आज जरा जास्तच उकडत आहे. हा उकाडा का वाढला हे लक्षात आले आहे. आज बीडमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणीवस, पवार आले आहेत. त्याहीपेक्षा अधिक पारा वाढला, कारण धनजंय आणि मी एकाच व्यासपीठावर आलो आहेत.' पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर सभास्थळी एकच हशा पिकला.

Pankaja Munde
Uddhav Thackeray On Adani : अदानींच्या कार्यालयावर ठाकरे गटाचा मोठा मोर्चा ; काय आहे कारण ?

शासन आपल्या दारी कार्यक्रमात आकर्षण म्हणून आला का असा प्रश्नही काहींनी पंकजा मुंडेंना विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, 'व्यासपीठावर बसलेले सर्व जण संविधानिक पदावरील मंडळी आहेत. यात माझा संविधानिक अशी कुठलीही भूमिका नाही. आज खासदार प्रीतम मुंडे अधिवेशनाला असल्याने येथे उपस्थित नाहीत. त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी आलेली आहे. तसेच परळीची कन्या म्हणून या कार्यक्रमाला आलेली आहे. परळीच्या विकासासाठी मी कोणत्याही मंचावर जाण्यास तयार आहे,' असेही मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंडेंनी वैद्यनाथ तिर्थक्षेत्राचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचेही आवाहन यावेळी केले. त्या म्हणाल्या, 'कोविड आणि राजकीय अडचणींमुळे परळीतील अनेक कामे रखडलेली आहेत. आता ही सर्व मार्गी लागणार आहे. वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २८६ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहेत. आता हे काम अत्यंत चांगले होण्यासाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच भाजपची सत्ता आलेल्या राज्यातील काही योजना महाराष्ट्रात राबवा,' असे आवाहनही मुंडेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केले.

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde
Dhananjay Munde : परळीतील कार्यक्रमापूर्वी मराठा आंदोलकांच्या 'शासन गो बॅक' च्या घोषणा अन् बसही रिकाम्या पाठवल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com