Pankaja Munde : छोट्या हॉटेलात मिसळपावचा अस्वाद अन् स्वतः बनवला चहा..

पंकजा मुंडे यांना पाहताच हाॅटेलमध्ये बरीच गर्दीही जमली. सर्वांनी त्यांचेसोबत फोटो, सेल्फी काढले. पंकजा मुंडे यांनी देखील सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला. (Bjp Leader Pankaja Munde)
Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Bjp Leader Pankaja Munde News, BeedSarkarnama
Published on
Updated on

बीड : जिल्हा दौऱ्यावर येत असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा ताफा एका छोट्या हॉटेलवर थांबला. (Beed) त्यांनी या ठिकाणी मिसाळपावचा अस्वाद घेतला आणि विशेष म्हणजे चहा देखील स्वतःच बनवला. पंकजा मुंडे (Pankaja Munde) बुधवारी औरंगाबादहून बिडकडे येत होत्या.

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरून त्यांचा ताफा एका छोट्याशा हॉटेलसमोर थांबला. इतर लोकांसमवेत पंकजा मुंडे देखील आपल्या हॉटेलवार उतरल्याचे पाहून हाॅटेल चालक दिपक शिंदे यांनाही सुखद धक्का बसला. (Marathwada) त्यांनी मुंडे यांचे स्वागत केले, यावेळी हाॅटेल मध्ये बसलेल्या सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या येण्याचे कुतूहल वाटले.

हाॅटेल चालकाच्या आग्रहावरून पंकजा मुंडे यांनी मिसळ-पाव आणि पोह्यांचा अस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर स्वतः चहा तयार करून घेतला व सोबतच्या कार्यकर्त्यांनाही दिला. यावेळी हाॅटेल चालक तसेच इतर ग्राहकांना त्यांचेसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

पंकजा मुंडे यांना पाहताच हाॅटेलमध्ये बरीच गर्दीही जमली. सर्वांनी त्यांचेसोबत फोटो, सेल्फी काढले. पंकजा मुंडे यांनी देखील सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाल्या.

Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Aurangabad : त्याचा एकच धंदा, राजकीय नेत्यांना फोन लावून भंडावून सोडणे..

पंकजा मुंडे यांच्या साधेपणाची चर्चा या निमित्ताने होत आहे. या निमित्ताने पंकजा यांनी काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. आपल्याला कडकच चहा लागतो, हे देखील त्या सांगायला विसरल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com