Pankaja Munde Birthday News
Pankaja Munde Birthday NewsSarkarnama

Pankaja Munde Birthday News : वाढदिवस साजरा न करता पंकजा मुंडे तिरुपती दर्शनाला..

BJP : तिरुपती दर्शनातून त्या राज्यात रांगेतील लोक "ताई "म्हणताना भरून आले, मी भरून पावले.
Published on

Marathwada : संघर्ष कन्या म्हणून ओळख असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस. पण काही दिवसांपुर्वी एका वृत्तवाहिनीने पंकजा मुंडे काॅंग्रेसमध्ये जाणार, असे वृत्त दिले आणि पंकजा नाराज झाल्या. (Pankaja Munde Birthday News) इतक्या नाराज की त्यांनी थेट राजकारणापासून दोन महिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. कुणाला भेटणार नाही, बोलणार नाही, माध्यमांशीही संवाद न साधण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता.

Pankaja Munde Birthday News
Dhananjay Munde Wishes Pankaja: `ताई तुझ्या हातून कायम सत्कार्य घडो`, मंत्री मुंडेंच्या बहिणीला शुभेच्छा...

या पार्श्वभूमीवर वाढदिवशी देखील कुणाला न भेटण्याचा निर्णय आणि तसे आवाहन करत पंकजा मुंडे (Pankaja Munde) कालच मुंबईहून तिरुपतीला गेल्या. (BJP) वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस, त्यामुळे दोन महिन्याच्या राजकारणातून ब्रेक घेत पंकजा यांनी वाढदिवशी तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या आज मुलगा आर्यमनसोबत तिरुपती येथे आहेत.

इकडे महाराष्ट्रात व इतर राज्यातून पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पण त्या राज्यातच नसल्याने त्यांना प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा असणाऱ्यांचा हिरमोड झाला. (Maharashtra) पण या समर्थकांची काळजी घेत पंकजा यांनी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत तुमच्यासाठी प्रार्थना करेन, असे म्हटले आहे. पंकजा यांनी आपण तिरुपतीला आलो असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

पकंजा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तिरुपती येथे आगमन, श्रीकालहस्ती येथे दर्शन. वाढदिवसात भेदभाव नाही अगदी कोणालाच भेटले नाही. माझा मुलगा आर्यमन आणि मी !! तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतच आहेत. नम्र आभार, कोटी कोटी धन्यवाद.

एक निवडणं शक्य नाही १० हजारांनी ही भागणार नाही, किती जणांना भेटू आणि किती फोन वर बोलू. सर्वाना कनेक्ट नाही होणार, म्हणून नम्रपणे विनंती केली. सेलिब्रेशन नको, तुमचे एवढे सारे आशिर्वाद मिळाले. तिरुपती दर्शनातून त्या राज्यात रांगेतील लोक "ताई "म्हणताना भरून आले, मी भरून पावले, अशा भावना पकंजा यांनी व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com