Pankaja Munde News : पंकजा मुंडे यांचा विधानसभेचा मार्ग खडतर ?

Bjp : पंकजा गप्प आहेत तर कट्टर विरोधक राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्यावे लागणार म्हणून कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
Dhnanjay Munde-Pankaja Munde, News
Dhnanjay Munde-Pankaja Munde, NewsSarkarnama

Marathwada : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केले आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या बंडात त्यांच्यासोबत असलेल्या परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपदाची लाॅटरी लागली. (Pankaja Munde News) या नव्या बदलत्या समीकरणामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विधानसभेचा मार्ग काहीसा खडतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dhnanjay Munde-Pankaja Munde, News
Imtiaz Jalil On Pm Modi : मोदीजी सगळ्यांना कोणत्या साबणाने स्वच्छ केले ? आम्हीही येतो..

सध्या राज्यात असलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकार विधानसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे गेले, तर परळी मतदारसंघातून पंकजा की धनंजय मुंडे? (Dhnanjay Munde) असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. (Pankaja Munde) या पार्श्वभूमीवर परळीमध्ये आतापासूनच चर्चा रंगू लागल्या आहेत. परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढतीमुळे चर्चेत असतो.

हा मतदारसंघ भाजपचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व असलेला असून त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी याचे प्रतिनिधित्व केले होते. (Parli) मात्र २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला. या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी मतदारसंघावर चांगली पकड मिळवली. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मंत्रीपदाच्या काळात त्यांनी मतदारसंघात निधी व विकासकामे केल्यामुळे त्यांची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे बोलले जाते.

या उलट पकंजा यांचा मतदारसंघाशी असलेला संपर्क कमी झाला. आता धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले आणि विधानसभेला सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या मंत्रीपदाचा वापर देखील ते मतदारसंघासाठी पुरेपूर करून घेतील. त्यामुळे पंकजा यांच्या परळीतून कमबॅक करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. अजित पवार भाजप सोबत आल्याने व आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्याने पंकजा यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सत्तेत सहभागी होताच अजित पवारांनी येणाऱ्या सर्व निवडणूका भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) एकत्र लढवू अशी घोषणा केली. यात परळी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहतो का भाजपकडे? यावर पुढच्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहे. पंकजा मुंडे यांनी मात्र यासर्व घडामोडी संदर्भात मौन बाळगले आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता देखील वाढली आहे.

Dhnanjay Munde-Pankaja Munde, News
Mp Omraje Nimbalkar News : उद्धव साहेबांनी कायम मुलासारखे प्रेम, माया दिली...

नुकतीच वैद्यनाथ साखर कारखान्याची झालेली बिनविरोध निवडणूक ही पंकजा आणि धनंजय हे बहिण भाऊ एकत्र येण्याची नांदी समजली जात होती. मात्र अचानक घडलेल्या घडामोडींमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पंकजा मुंडे या २ जुलैला परळीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला, पण पंकजा गप्प आहेत. तर कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत आगामी काळात जुळवून घ्यावे लागणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांत नाराजी पसरल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com