पंकजा मुंडेचा सूर बदललाः म्हणाल्या, फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा

त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. (Bjp Leader Pankaja Munde)
Fadanvis-Munde

Fadanvis-Munde

Sarkarnama

Published on
Updated on

बीड ः नगर पंचायत निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी जेव्हा आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी शांतपणे त्यांचे ऐकून घेतले. ५० टक्के जागांचा दोघांचा आग्रह होता. फडणवीस यांच्यांतील पेशन्सं शिकण्यासारखा आहे. (Bjp) मी ही त्यांच्याकडून पेशन्सं शिकले, त्यांच्याकडून बरच काही शिकण्यासारखं असल्याचे कौतुगोद्दगार भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काढले.

आष्टी नगरपंचायत निवडणुकीच्य प्रचारसभेत त्यांनी फडणवीसांबद्दल वरील उद्गार काढले. नेहमी फडणवीसांबद्दल राग व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांचा सूर अचानक कसा बदलला या बद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्या मराठवाड्यात नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना यावेळीही पहायला मिळणार आहे.

बीड जिल्ह्यात पकंजा मुंडे यांनी देखील प्रचारात उडी घेतली आहे. भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करतांना त्यांनी आष्टीच्या सभेत चक्क विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. आष्टी नगर पंचायतीतील जागा वाटपावरुन आमदार सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात वाद होता. यावर तोडगा काढण्यासाठी हे दोघेही फडणवीस यांच्याकडे गेले होते.

पन्नास टक्के जागा देण्याचा दोघांचा आग्रह फडणवीसांनी शांतपणे ऐकून घेतला. याचा उल्लेख पकंजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केला. त्या म्हणाल्या, फडणवीसांकडे असलेला संयम मी शिकले. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली.

परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवाला फडणीवस जबाबदार असल्याचा आरोप पंकजा यांच्याकडून वारंवार केला गेला. या शिवाय ते ओबीसी नेतृत्व संपवत आहेत, असेही बोलले गेले. विधान परिषद, राज्यसभेवर डावलल्यानंतर देखील या मागे फडणवीसच असल्याचा दावा पंकजा समर्थकांकडून वेळोवेळी केला गेला.

<div class="paragraphs"><p>Fadanvis-Munde</p></div>
फडणवीसांचा हल्लाबोल, हे दारू विकणाऱ्यांचे सरकार..

एवढेच नाही तर मी राष्ट्रीय नेता आहे, दिल्लीत काम करते त्यामुळे माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा हे आहेत, असे सांगत पंकजा यांनी फडणवीस यांचे राज्यातील नेतृत्व स्वीकारण्यास देखील एकप्रकारने नकरा दिला होता.

गेल्या तीन-चार वर्षात या दोन नेत्यांमधील संबंध कमालीची बिघडलेले आहेत. अशावेळी पंकजा मुंडे यांच्याकडून फडणवीसांचे कौतुक आणि त्यांच्याकडून खूप काही शिकरण्यासारखे असल्याचे केलेले वक्तव्य हे पंकजा मुंडे यांचा सूर बदलल्याचे दर्शवते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com