Parbhani APMC Election : नेत्यांनी ताकद लावली, उद्या ठरणार मतदारांचा कौल..

Market Committee : बॅलेट पेपरवर ६१ उमेदवार असले तरी १७ उमेदवारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
Parbhani APMC Election News
Parbhani APMC Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : जिल्ह्यातील ११ पैकी सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Parbhani APMC Election) निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. एकूण ३२० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा देखील या निमित्ताने पणाला लागली आहे. बहुतांश ठिकाणी थेट लढतीचे तर काही ठिकाणी मात्र तिरंगी लढतीने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

Parbhani APMC Election News
Beed APMC News : मतदानाला आलात तर जिवंत सोडणार नाही, आमदार क्षीरसागर, खाडे, म्हस्के यांनी धमकावल्याचा आरोप..

जिल्ह्यातील (Parbhani) परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर, बोरी, पूर्णा व ताडकळस या सात बाजार समित्यांच्या निवडणुकीत विविध मतदार संघातील १२६ जागांसाठी उद्या सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. (Sanjay Jadhav) ३९ मतदार केंद्रांवर एकूण १२ हजार २७७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सात बाजार समित्यांमधील सहकारी संस्था मतदार संघात एकूण १८७ उमेदवार, ग्रामपंचायत मतदार संघात ८३ उमेदवार, व्यापारी-अडते मतदार संघात २८ उमेदवार तर हमाल-मापारी मतदार संघात २२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. (Babajani Durrani)

सहकारी संस्था मतदार संघात तीन हजार ८२९, ग्रामपंचायत मतदार संघात चार हजार २१०, व्यापारी मतदार संघात दोन हजार ३२८ तर हमाल-मापारी मतदार संघात एक हजार ९१०, असे एकूण १२ हजार २७७ मतदार पुढचे सत्ताधारी कोण हे ठरवणार आहेत. शनिवारी मतमोजणी होईल.निवडणुकीच्या रिंगणात सर्व Parbhani APMC Election त्यामुळे ४४ उमेदवारांमध्येच ही लढत होणार असल्याचे बोलले जाते.

महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या युतीत ही लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, काॅंग्रेसचे आमदार वरपूडकर, भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे बाबाजाणी दुर्राणी, राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे या नेत्यांनी निवडणुकीत आपली शक्तीपणाला लावली आहे. त्यामुळे मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात मतांच दान टाकतात हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com