परभणी : निवडणुका आल्या की प्रलोभन, आश्वासनं, पार्ट्या, लक्ष्मीदर्शन यांची चर्चा सुरू होते. राजकीय पुढारी, विविध पक्षांचे पदाधिकारी यात आघाडीवर असतात. (Parbhani) देश पातळीपासून तर अगदी गावातील निवडणुकांमध्ये हे चित्र नेहमीच पहायला मिळते. गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी यासंदर्भात एक विधान नुकतेच केले, त्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
त्यांच्या पक्षातील प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी `निवडणुकीमध्ये चौघांपैकी तिघांचे पैसे घ्या आणि एकाला मतदान करा`, असा भन्नाट सल्ला दिला आहे. (Marathwada) विशेष म्हणजे जे पैसे वाटतात, त्यांनी तरी ते कुठे घामाने, कष्टाने कमावून आणलेले असतात, मग त्यांना लुटले तर काय फरक पडतो, असा उपदेशही केला. त्यांच्या या विधानची चर्चा राजकीय वर्तुळात चवीने सुरू आहे.
गुट्टे यांनी हा सत्ला देतांना लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याकडे मात्र लक्ष दिलेले दिसत नाही. नगरपरिषद निवडणुकीत पैठण तालुक्यात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर भाषणात लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख केला होता. आता लक्ष्मीदर्शनाचे दिवस आहेत, लक्ष्मी दारात आली तर तिला नाही म्हणून नका, असे विधान तीन वर्षांपुर्वी केले होते. त्याची आठवण देखील गुट्टे यांच्या या सल्ल्यामुळे होत आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी निवडणुकीत तिघांचे पैसे घ्या,आणि चौथ्याला मतदान करा, असे आवाहन करून एकच खळबळ उडवून दिली आहे. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला, त्यावेळी गंगाखेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. खर्च करणारे उमेदवार यांनी नांगर हाणून पैसे आणलेले नसतात, त्यांनीही जनतेला लुटलेलच असते.
त्यामुळे त्यांना आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन उमेदवारांचे पैसे घेऊन चौथ्या उमेदवाराला मतदान करा व त्याला आपण फुकट निवडून दिले आहे असे समजा. उद्या त्याने काम केले नाही तर तुम्ही त्याची कॉलर पकडू शकता, अशी मखलाशी देखील केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.