Parbhani : मुख्यमंत्र्यांनी फोन करून विचारले, मेळाव्याला गर्दी आहे का?

शिंदे सेनेतील कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अनुक्रमे परभणी, अकोला, बीड जिल्ह्यात मेळावे घेतले. (CM Eknath Shinde)
Cm Eknath Shinde-Minister Abdul Sattar News, Parbhani
Cm Eknath Shinde-Minister Abdul Sattar News, ParbhaniSarkarnama

परभणी : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात काढलेल्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिंदे सेनेकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा अभियान सुरू करण्यात आले आहे.(Parbhani) शिंदे सेनेतील अनेक मंत्री राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन मेळावे घेत आहेत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे राज्याची कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळावा सुरू असताना अचानक सत्तार यांचा फोन खणखणला. तो मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे सत्तार कानाला हात लावून बाजूला गेले. तेव्हा (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी मेळाव्याला गर्दी किती आहे? अशी विचारणा केली. यावर सत्तार यांनी पूर्णा सारख्या ठिकाणी मेळाव्याला चांगली गर्दी आहे, दोन मिनिटं तुम्ही फोनवरूनच त्यांना शुभेच्छा द्या, असे म्हणत स्पीकर फोन उपस्थितांना ऐकवला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंड यशस्वी होऊन सत्तांतर झाले, मात्र त्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. या सर्व आमदारांवर ५० कोटी घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेत आपल्याला किती पाठिंबा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे त्यांचे उसने अवसानच ठरले.

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून शिंदे सरकारने देखील हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेच्या माध्यमातून आपल्याला जनतेचा किती पाठिंबा आहे हे तपासून पाहण्याचा प्रयत्न सुरू केला. आज मराठवाडा, विदर्भ आणि राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये शिंदे सेनेतील कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अनुक्रमे परभणी, अकोला, बीड जिल्ह्यात मेळावे घेतले.

Cm Eknath Shinde-Minister Abdul Sattar News, Parbhani
Parbhani : शिवसैनिकांनी सत्तारांचा ताफा अडवला ; `पन्नास खोके`च्या घोषणाही दिल्या..

परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे मेळाव्यात मार्गदर्शन करत असताना अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. तो फोन घेऊन सत्तार व्यासपीठाच्या कोपऱ्याला गेले, सर सर म्हणत ते त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. त्याचवेळी शिंदेंनी मेळाव्याला गर्दी किती आहे असा प्रश्न केला. त्यावर अनपेक्षित गर्दी आहे, मी तुमचा फोन स्पीकरवर टाकतो तुम्ही उपस्थितांना शुभेच्छा द्या, असे म्हणत मेळाव्यांना भरपूर पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे यांनी हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा किती गांभीर्याने घेतली आहे, हे यावरून स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com