National Panchayat Award News : कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीला `राष्ट्रीय पंचायत पुरस्कार`

Patoda Gram panchayat : कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.
National Panchayat Award News
National Panchayat Award NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना (Grampanchayat) `राष्ट्रीय पंचायत` पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

National Panchayat Award News
Vaijapur Market Committee News : आमदार बोरनारे यांच्याविरोधात भाजपची महाविकास आघाडीला साथ...

तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (Marathwada)

येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने १७ ते २१ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. (Dehli) या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल विशेष पंचायतीचा व्द‍ितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सरपंच जयश्री द‍िवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, जिल्हा परिषद अधिकारी विकास मिना, उपमुख्य अधिकारी शिवराज केंद्र, ग्रामसेवक पुंडलिक पाटील यांनी स्वीकारला.

कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या गावाने रस्त्यांच्या दोन्ही कडेला फळ भाज्यांची झाडे लावली आहेत. प्रदूषण मुक्त गाव होण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. व्यासपीठावरून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कप‍िल पाटील यांनी या गावाच्या कामाचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com