मुंबई ः मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या पवन राजेनिंबाळकर खून प्रकरणात आज (ता. १३ ऑक्टोंबर) डॉ. पद्मसिंह पाटील हजर झाले. यावेळी माफीचा साक्षीदार झालेल्या पारसमल जैन याने डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख पटवून दिली. या प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर ९ जनांवर सीबीआय मार्फत गुन्हा दाखल होवून दोषारोप पत्र दाखल आहे. त्यामुळे आता या खून प्रकरणाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर यांचा कळंबोली येथे राजकीय वैमनस्यातून खुन करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला मुंबई येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील एक आरोपी पारसमल जैन याने न्यायालयात माफीचा साक्षीदार म्हणुन साक्ष देण्यासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो मंजुर केल्यानंतर पारसमल जैन यांची मुंबईतील सत्र न्यायालयात साक्ष नोंदवण्याचे काम सुरू होते.
६ ऑक्टोंबर २०२१ रोजी सदर खटल्याची सुनावणी होती. पारसमल जैन यांनी सर्व आरोपींची ओळख न्यायालयास पटवून दिली. परंतु त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील गैरहजर होते. त्यांच्या वकीलांनी ते आजारी असल्याचे कारण देत न्यायालयाकडे मुदत मागीतली होती. त्यानूसार आज १३ ऑक्टोंबर रोजी डॉ. पाटील न्यायालयात हजर झाले.
सीबीआय विरुद्ध डॉ.पद्मसिंह पाटील व इतर या स्व.पवनराजे निंबाळकर व समद शेख या दुहेरी खून खटल्यातील आरोपी क्रमांक चार पारसमल जैन याने यापूर्वीच न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होणे बाबत विनंती अर्ज केला होता. जैन यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली तेव्हा स्व. पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याचे कबूल करत त्याने या कटात डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला इत्यादी आरोपी यांचे संबंध त्याच्यासोबत कसे आले, हे कोर्टासमोर सांगितले.
सदर खटल्यात खूना संदर्भात झालेला घटनाक्रम जशास तसा जैन याने न्यायालयात उलगडून सांगितला. जैन यांची सीबीआयच्यावतीने सुरू असलेली साक्ष नोंदणी संपली असून त्यांचा उलट तपास आरोपींच्या वतीने घेण्यासाठी २६ आॅक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. सदर प्रकरणात सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील एजाज खान प्रकरणातील फिर्यादी निंबाळकर कुटुंबियांच्या वतीने ॲड. पांडुरंग गवाड व ॲड. रमेश मुंढे हे काम पाहत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.