खुद्द पवारच म्हणाले,`हा गडी तिकडे जास्त रमणार नाही, याची मला खात्री होती..

विजय गव्हाणे मुंडेबरोबर गेले तली मला त्यांची कधीही चिंता नव्हती. कारण ते भाजपचे विचार कधीच स्वीकारणार नाहीत, याचा मला विश्वास होता. (Sharad Pawar)
Sharad Pawar-Jayant Patil-Vijay Gavhane
Sharad Pawar-Jayant Patil-Vijay GavhaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विजय गव्हाणेंची मला कधीही चिंता नव्हती. गोपीनाथ मुंडेसोबतच्या मैत्री खातर ते भाजपमध्ये (Bjp) गेले होते, पण त्या पक्षाचे विचार त्यांनी कधीच घेतले नाही. (Ncp) ते इकडे येणारच होते, आता ते आलेत याचा मला आनंद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विजय गव्हाणे यांचे पक्षात स्वागत केले. हा गडी तिकडे जास्त रमणार नाही, याची मला खात्री होती, असे ते म्हणाले.

भाजपमध्ये आता बहुजनांचा विचार होत नाही, उत्तर प्रदेश आम्हीच जिंकणार म्हणणाऱ्या या पक्षाला सोडून आता अनेकजण बाहेर पडत आहेत, गोव्यात देखील हेच चित्र असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला.

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि परभणी जिल्ह्यातील भाजपचे नेते विजय गव्हाणे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल झालेल्या गव्हाणे यांचे स्वागत करतांनाच शरद पवारांनी आपल्या भाषणात काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.

शरद पवार म्हणाले, आज समाजकारणाच्या विचाराची गरज आहे आणि आपण तोच करतो आहोत. गव्हाणे ज्या परभणी जिल्ह्यातून आले आहेत तो जिल्हा मराठवाड्यातील महत्वाचा जिल्हा आहे. कारण १९४७-४८ च्या काळात काॅंग्रेसला सोडून एक मोठा वर्ग बाजूला गेला आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला तो याच जिल्ह्यातून.

अण्णासाहेब गव्हाणे हे त्या पक्षाचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते होते. त्याकाळात त्यांनी लोकांची खूप मदत केली, तोच विचार घेऊन आज विजय गव्हाणे पुढे जात आहेत. विजय गव्हाणे हे दोस्तीला खरे उतरणारे नेते आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय मैत्री खातरच ते भाजपमध्ये गेले होते. गोपीनाथ मुंडे हे आमचे राजकारणातील विरोधक असले तरी ते मैत्रीत नेहमीच खरे आणि प्रमाणिक होते.

Sharad Pawar-Jayant Patil-Vijay Gavhane
फडणवीस तर स्टेजवरचे अॅक्टर, राणे, विखेच भाजप चालवतात..

त्यामुळे विजय गव्हाणे मुंडेबरोबर गेले तली मला त्यांची कधीही चिंता नव्हती. कारण ते भाजपचे विचार कधीच स्वीकारणार नाहीत, याचा मला विश्वास होता. त्यामुळे ते इकडे येणारचं होते आणि आता ते आले यांचा मला आनंद असल्याचे पवार म्हणाले. भाजपच्या राजकीय विचारसरणीवर टीका करतांना पवारांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला सोडून जाणाऱ्या नेत्यांचे उदाहरण दिले.

भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात.

उत्तर प्रदेशमध्ये तर आम्हीचं जिंकणार हे चित्र भाजपने तयार केले. पण रोज त्यांच्या पक्षातून कुणीतरी सोडून बाहेर पडतो आहे. आधी तेरा, नंतर सात मग चार असे अनेकजण या पक्षाला सोडून जात आहेत. गोव्यात देखील हेच चित्र पहायला मिळतंय. या पक्षात आता बहुजनांचा विचार होत नाही, हे सत्य आहे. शाहू, फुले यांच्या विचारांचे लोक पुन्हा आमच्या पक्षात येत आहेत याचा माला आनंद असल्याचेही पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com