Sanjay Bansode News : जनता नव्या सरकारला कंटाळली, महाविकास आघाडीचे दोनशे आमदार निवडून येतील..

Ncp : माझ्यासारख्या एका सामन्यातील सामान्य कार्यकर्त्याला मंत्री बनविण्याची दानत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यात आहे.
Ex. Minister Sanjay Bansode News, Latur
Ex. Minister Sanjay Bansode News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Latur : राज्यातील लोकांना आता शिंदे-फडणवीस सरकारची नियत कळली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोक आघाडीच्या उमेदवाराला भरघोस संख्येने निवडून देतील. कमीत कमी दोनशे आमदार आघाडीचे निवडून येतील, असा दावा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी केला. औसा येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Ex. Minister Sanjay Bansode News, Latur
Jayant Patil News : चाकूरकरांनीच मला राजीव गांधींकडून पहिल्यांदा तिकिट दिले होते..

लोकांना आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) हवे आहे, तशी इच्छा लोक अनेक ठिकाणी व्यक्त करतात. भाजपा केवळ इतर पक्षातील लोकांवर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्याकडून रोज हा आमच्या पक्षात येणार असल्याच्या बाता मारल्या जातात, अशी टीका देखील त्यांनी केली. (Ncp) राज्यात भाजपावरचा विश्वास कमी होत असून त्यांना निवडून येण्याची शाश्वती नसल्याने इतर पक्षातील लोकांना भूलथापा व भीती घालून पक्षात घेतले जात आहे.

माझ्यासारख्या एका सामन्यातील सामान्य कार्यकर्त्याला मंत्री बनविण्याची दानत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. विजय जरी आपला वाटत असला तरी गाफील राहणे धोकादायक ठरू शकते. औसा तालुका हा राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना मानणारा तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो.

राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी शहराचा कायापालट केला आहे. औसा पालिकेवर तर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल मात्र शहरव्यतिरिक्त ग्रामीण भागातही पक्षाचा विचार आणि कार्य रुजले पाहिजे. फडणवीसांची सध्याची भाजपा ही कमालीची अस्थिर असून यांना मतदार निवडून देणार नाहीत. यासाठी हे दररोज अमुक आमच्या पक्षात येणार आहे, आशा वल्गना करतात.

बळजबरीने आणि भीती दाखवून पक्ष प्रवेश दिला जात असलेल्या पक्षाला उद्या मतदारांपुढे मते मागण्याची भीती वाटत आहे. कशाच्या जोरावर ते मते मागू शकतात? फोडफोडीचे हे राजकारण लोकांना आता पूर्ण कळलेले आहे. आघाडी सरकारने कोरोना काळात आणि त्यानंतर केलेल्या लोकहितकारी राजकारणाची आस लागली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या दोनशे जागा नक्की येतील, याचा पुनरुच्चार बनसोडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com