Ashok Chavan On Karnataka Victory : `बजरंग बली की जय`, ऊपरवाले की लाठी मे आवाज नही होती..

Congress : या निकालाचा अन्वयार्थ स्पष्ट आहे. जनतेला विकास हवा, देव-धर्माच्या नावावर राजकारण नको.
Ashok Chavan News, Maharashtra
Ashok Chavan News, MaharashtraSarkarnama

Maharashtra : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली आहे. या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. कर्नाटकातील हा विजय म्हणजे देशातील परिवर्तनाची नांदी असल्याचा दावा देखील काॅंग्रेसकडून केला जातोय. या निवडणुकीत `बजरंग बली`, चा मुद्दा देखील शेवटच्या टप्यात चर्चिला गेला. यावरूनच आता काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Ashok Chavan News, Maharashtra
PWD Minister Ravindra Chavan : रस्त्यावर पडणाऱ्या पावसातून भूजल पुनर्भरणाचा `लातूर पॅटर्न` राज्यभर राबवणार..

कर्नाटकातील विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना (Ahsok Chavan) अशोक चव्हाण म्हणाले, `बजरंग बली की जय`, ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती! (Karnataka Election) कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मतदारांचे, अखिल भारतीय काॅंग्रेसच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या निकालाचा अन्वयार्थ स्पष्ट आहे.

जनतेला विकास हवा, देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. सत्तेच्या जोरावर लोकशाही पद्धतीने निवडून आलेली विरोधकांची सरकारे फोडाफोडीचे राजकारण करून पाडले आणि सत्ता बळकावणे हे जनतेला अजिबात मान्य नाही. (Maharashtra) कर्नाटकात देखील भाजपने गेल्यावेळी हेच केले होते. पण आता जनतेला विकासावर बोलणारे, कृती करणारे सरकार हवे आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, सुरक्षा या विषयावर कर्नाटकातील जनतेने मतदान केले आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात महिलांच्या प्रश्नांनाना प्राधान्य दिले होते. महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास, आर्थिक दुर्बल महिलांना दरमहा मदत, बेरोजगार तरुणांना भत्ता हे विषय आम्ही वर्षभरात सोडवण्याचे आश्वासन दिले होते. याचा परिणाम महिलांच्या मतांचे प्रमाण वाढवण्यावर झाला. या उलट भाजपने बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा, केरळ स्टोरी चित्रपटावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या मुद्यांना प्राधान्य दिले. जे लोकांना आवडले नाही, असेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com