Maratha Reservation : आंदोलनाच्या आता लोकप्रतिनिधींनाही झळा; रात्रीतून हटवावे लागले वाढदिवसाचे बॅनर

Maratha Agitation : धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांत लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी
Rana Jagjit Singh Banner
Rana Jagjit Singh BannerSarkarnama
Published on
Updated on

Maratha Agitation News : मराठा आरक्षाण आंदोलनाची धग वाढली आहे. त्याच्या झळा आता लोकप्रतिनिधींना बसू लागल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांत लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब (जि. धाराशिव) शहरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. सोशल मीडियावर याबाबत टीकेची झोड उठल्यानंतर ते बॅनर काढून घेण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rana Jagjit Singh Banner
Maratha Reservation : उमरग्यातील पाच जणांच्या उपोषणाला दुसऱ्याच दिवशी शेकडोंचा पाठिंबा

कळंब तालुक्यातील विविध गावांत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. शिवाय, शहरात २५ ऑक्टोबर रोजी कॅण्डल मार्च काढण्यात आला. २६ ऑक्टोबरला ११ वाजता आरक्षणाला विरोध करणाऱ्या विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.

अशावेळीही तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील दुभाजकातील खांबाला शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यावर सोशल मीडियावर टीका झाली. त्यामुळे रात्रीतून ते बॅनर कार्यकर्त्यांनी काढून घेतले. बॅनरचा मुद्दा शहरात चांगलाच चर्चेत आला आहे.

सरकारने मुदतीत मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने समाजात चीड निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मुद्दा हा शिर्डीच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा होता, अशी भावना मराठा समाजात आहे.

शहरातील येरमाळा रस्त्यावर दुभाजकामधील खांबाला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यांचा वाढदिवस ३० ऑक्टोबर रोजी आहे. राणा पाटील हे सध्या सत्तेतील आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या वेदना, अडचणी राणादादांसमोर मांडाव्यात, त्यांना आंदोलनाला पाठिंबा द्यायला लावावा, अशी अपेक्षा मराठा समाजातील कार्यकर्त्यांची आहे.

Rana Jagjit Singh Banner
Maratha Reservation : आता कष्टाचं चीज होण्याची वेळ आलीय, आत्महत्या का करताय?

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेशबंदी -

सध्या ग्रामीण भागात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कुठलेही राजकीय कार्यक्रम होऊ दिले जात नाहीत. पण शहरी भागात राजकीय कार्यक्रम होत आहेत. शहरी भागातील मराठा समाज अजूनही झोपलेला आहे का? त्यांना आरक्षणाची गरज वाटत नाही?, अशा टीकेची झोड सोशल मीडियावर उठवण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे बॅनर काढून घेतले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com