Marathwada : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आणि माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातल्या बाजार समितीत (Phulambri APMC Result News) अखेर सत्ता परिवर्तन झाले आहे. माजी आमदार तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता असलेली ही बाजार समिती बागडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गटाने १४ जागा जिंकत ताब्यात घेतली.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आमदार बागडे (Haribhau Bagde) यांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर मतदारसंघातील बाजार समितीत देखील आपला करिश्मा दाखवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने बागडे यांनी `करून दाखवलं` अशी चर्चा आहे. (Bjp) फुलंब्री बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी आज मतदान झाले आणि सायंकाळीच मतमोजणी होवून निकाल हाती आला.
त्यानूसार भाजप-शिंदे गटाने १४ जागा जिंकत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ एक जागा मिळाली. (Congress) शिंदे गटाचे ठोंबरे यांनी भाजप सोबत न जाता स्वतंत्र उमेदवार दिले होते, त्यांच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. तर हमाल व तोलारी मतदारसंघातून १ अपक्ष उमेदवार विजयी झाला.
काॅंग्रेसची पंधरा वर्षांची सत्ता गेल्यानंतर भाजप-शिंदे गटाने एकच जल्लोष केला. तर हा धनशक्तीमुळे झालेला विजय असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. यंदा परिवर्तन घडवायचे आणि भाजप-शिंदे गटाची सत्ता आणायचीच असा चंग बागडे व त्यांच्या समर्थकांनी बांधला होता.
ठाकरे गटात फूट पडल्यानंतरही भाजपने फुलंब्रीत सत्ता परिवर्तन घडवले. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीपाठोपाठ फुलंब्रीत भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारल्यामुळे आमदार बागडे यांचे जिल्ह्यात व मतदारसंघात वजन वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.