खेळा, अभ्यास करा आणि देशाचे उज्वल भविष्य घडवा; दानवेंकडून बालदिनाच्या शुभेच्छा

(Central State Railway Minister Raosaheb Danve) आपल्या नातीसोबतचे सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत देशभरातील लहान मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Minister Raosaheb Danve
Minister Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आज जंयती. नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची म्हणून हा दिवस बालदिन म्हणून देखील उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरातून लहान मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील या बालदिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या दोन नातींना कडेवर घेत त्यांनी एक फोटो व्हायरल केला आहे. `सर्व बाल-गोपालांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप मोठे व्हा, चांगल नाव कमवा, खेळा, अभ्यास करा आणि स्वतः बरोबर देशाचेही उज्वल भविष्य घडवा`, अशा शब्दांत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

रावसाहेब दानवे हे कुटुंबात रमणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सण, उत्सव असला की ते आपल्या नातींबरोबर वेळ घालवतात. आमदार संतोष दानवे यांना युवराज्ञी आणि वसुंधरा या दोन मुली आहेत. आजोबा रावासाहेब दानवे दिल्लीहून भोकरदनला आले की आपल्या नातींसोबत खेळतात.

नातीचा बालहट्ट पुरवतांना दुकानात जाऊन त्यांना खेळणी, बाहुली खरेदी करून देतांना देखील दानवे अनेकदा दिसले.आज बाल दिनानिमित्त देखील त्यांनी आपल्या नातीसोबतचे सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत देशभरातील लहान मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Minister Raosaheb Danve
कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com