कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरसाठी (pandharpur) रेल्वे प्रशासनानं (railway) भाविकांसाठी सात नव्या रेल्वे गाड्या (special 7 extra trains) सुरु केल्या आहेत.
कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!
Published on
Updated on

पुणे : कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरला (pandharpur kartik yatra) राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. पण यंदा एसटीचा संप सुरु असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच रेल्वनं भाविकांना सुखद धक्का दिला आहे.

यंदा लालपरीनं पाठ फिरवली असली तरी विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या मदतीला रेल्वे धावून आली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरसाठी (pandharpur) रेल्वे प्रशासनानं (railway) भाविकांसाठी सात नव्या रेल्वे गाड्या (special 7 extra trains) सुरु केल्या आहेत.

दोन वर्षांपासून यात्रा बंद होती. यंदा यात्रेला परवानगी देण्यात आली, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एसटीचा संपात विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांना यंदाची कार्तिकी वारी चुकणार का हा मोठा प्रश्न पडला होता.

कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!
परमबीर सिंहांना फरार घोषित करण्यासाठी CID नंतर गुन्हे शाखेच्याही हालचाली सुरु

रेल्वेच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं कार्तिकीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी 7 नव्या रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यात्रेदरम्यान तिकीट आरक्षणाच्या आणखी चार खिडक्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.

वारकरी हे ग्रामीण भागातील असतात त्यांना लिहण्यावाचण्यास अडचण होते म्हणून अनारक्षित खडकीही उघडण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेसाठी 'लातूर -पंढरपूर', 'मिरज -पंढरपूर', 'लातूर – मिरज', 'मिरज- लातूर', 'बिदर- पंढरपूर-मिरज', 'आदिलाबाद- पंढरपूर', 'नांदेड- पंढरपूर' आणि 'सांगली -पंढरपूर' या नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहणार असल्याने वारीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केच वारी भरेल अशी शक्‍यता आहे. रेल्वेनं 3 लाखांहून हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात येतील, असा अंदाज प्रशासनच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com