Maratha Reservation News : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. (Jalna News) उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस घेऊन जात होते.
त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालून जरांगे पाटील यांना रुग्णालयात घेवून जाण्यास विरोध केला. (Fir Filed) पोलिसांवर दगडफेक केली, त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. (Maratha Reservation) यात आंदोलकांवर केल्या लाठीहल्ल्यात अनेकजण तर आंदोलकांच्या दडफेकीत पोलिसही गंभीर जखमी झाले होते. याशिवाय पोलिसांची एक कारही आंदोलकांनी जाळून टाकली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, (Marathwada) अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादंवि. ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७, ४३५, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करीत आहेत.
दरम्यान, धुळे- सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री ते शहागड रस्त्यावर १६ बसेस जाळण्यात आल्या. तर तीन बस फोडल्याची तक्रार राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.