Marathwada Political News : 'पाऊले चालती पंढरीची वाट', राजकीय नेत्यांना आस विठुरायाची

Wari abhimanyu pawar rajesh tope pratap patil chikhalikar : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेश टोपे, परभणीचे खासदार संजय जाधव वारीला निघालेल्या दिडींत सहभागी होऊन विठू नामाचा गजर करताना दिसले.
wari abhimanyu pawar pratap patil chikhalikar
wari abhimanyu pawar pratap patil chikhalikarsarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : आषाढी एकादशीच्या आधी राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीमुळे सध्या राज्यातील वातावरण भक्तीमय झाले आहे. विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनाची आस घेवून हजारो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. यात विविध राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार मंत्रीही सहभागी होताना दिसत आहे. नेते वारकऱ्यांची सेवा करून पुण्य पदरात पाडून घेऊ पाहत आहे, तर काहींची पाऊले थेट पंढरपूरच्या दिशेने निघाली आहेत.

मराठवाडा ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते. या भागातून शेकडो दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. या मार्गावर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी जमेल तशी त्यांची सेवा करत काही वेळ का होईना दिंडीत सहभागी होताना दिसत आहेत. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेश टोपे, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह अनेक नेते मंडळी, आमदार, खासदार दिडींत सहभागी होऊन विठू नामाचा गजर करताना दिसत आहेत.

हजारो वारकऱ्यांसह विठ्ठलनामाचा गजर करीत वारीत चालण्याच्या परमोच्च सुखाची पुन्हा एकदा अनुभुती नेत्यांनी घेतली. वारी म्हणजे एकाच वेळी माणसांना माणसांशी आणि माणसांना परमात्म्याशी जोडणारी जगातील सर्वात थोर परंपरा. इथं प्रत्येकाला फक्त विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि प्रत्येक जण तन मन हरखून विठ्ठलभक्तीत तल्लीन. इथं कसला भेदभाव नाही की कसला अहंभाव नाही. प्रत्येक जण हरीभक्त आणि प्रत्येक जण हरीचा कण, जय जय राम कृष्ण हरी, अशी भावना आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar यांनी व्यक्त केली आहे.

नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोणंद जिल्हा सातारा येथे पंढरपूरच्या विठु माऊलीच्या वारीत सहभागी होऊन ह.भ.प. गुरुवर्य माऊली महाराज मुडेकर यांच्या दिंडीला भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. तसेच वारकऱ्यांशी संवाद साधत भक्तीत तल्लीन होण्याची अनुभूती घेतली. जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी श्रीपुर येथे ह.भ.प.पंढरीनाथ महाराज तावरे नाना यांच्या दिंडींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

अनेक दिंड्यांना भेट देत काळे यांनी पालखीचे दर्शनही घेतले. राजेश टोपे यांनी मौजे वडीगोद्री ता.अंबड येथे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत मुक्ताई च्या पादुका पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. भरपूर पाऊस पडू द्या,आमच्या शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख समाधान लाभू द्या,महाराष्ट्रातील जनता निरोगी, निरामय राहू द्या, असे साकडे टोपे यांनी दर्शन घेताना घातले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com