शितल वाघमारे -
Osmanabad News : राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर लिमिटेडने ताब्यात घेतलेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट साकडे घातले आहे.
कारखान्याच्या धुराड्यातून काळी राख परिसरातील गावांमध्ये पसरत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागातील अधिकारी दबावापोटी डोळे झाक करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून राखेचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत कारखान्याचे धुराडे बंद ठेवा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ढोकी येथील तेरणा साखर(Terna factory) कारखान्याच्या धुराड्यातून काळ्या रंगाची राख बाहेर पडत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत तक्रार करूनही प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांकडून डोळेझाक केली जात आहे. अशी डोळेझाक करणार्या अधिकार्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी ढोकी येथील नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परिसरात हवेत राख पसरत असल्याने वाळत घातलेले कपडे काळे होत आहेत. नागरिकांच्या अंगावर राख पडत आहे. श्वसनाच्या आजाराची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांची आहे. मात्र जाणिवपूर्वक अधिकारी वर्ग याबाबीकडे दूर्लक्ष करीत आहेत.
अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे परिसरातील गावांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अधिकार्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात यावी आणि राखेचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी शामराव छगनराव देशमुख, इमरान नूर अहेमद शेख, काकासाहेब विनायक पाटील, रामप्रसाद उध्दव हजारे, कमलाकर साधू वाणी आदींनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांच्या कारखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार याकडे ढोकी आणि परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
(Edited by - mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.