Osmanabad : `तेरणा` कारखाना ताब्यात घेत आमदार सावंतांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले..

अनेक वर्ष तेरणा साखर कारखान्यावर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आलटून पालटून कमी अधिक प्रमाणात वर्चस्व राहिले आहे. (Mla Tanaji Sawant)
Mp Omraje Nimabalkar-Rana Patil-Tanaji Sawant
Mp Omraje Nimabalkar-Rana Patil-Tanaji SawantSarkarnama

परंडा : शिवसेनेचे डॅशिंग तितकेच आक्रमक आणि वादग्रस्त नेते म्हणून आमदार प्रा. तानाजी सावंत ओळखले जातात. (Osmanabad) जिल्ह्यातील सत्ता केंद्र आपल्या हातात राहिली पाहिजे असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. जिल्ह्यातील सर्वात जुन्या कुलूप बंद तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा आता त्यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शुगर्सकडे आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारणाच्या ' चाव्या ' त्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

शिवसंपर्क मोहिमे दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काॅंग्रेस पक्षाला चांगलाच दम भरला होता. आम्हाला राष्ट्रवादी-काॅंग्रेसची गरज नाही, तर त्यांना आपली गरज असल्याचे ठणकावून सांगत शिवसेनेच्या (Shivsena) ताकदीचा दाखला दिला होता. हे करत असतांना सावंत (Tanaji Sawant) यांनी पक्षातील काही नेत्यांना देखील खडेबोल सुनावले होते. कोणत्याही परिस्थिती जिल्ह्यातील सत्ता सुत्रे शिवसेनाच्या म्हणजेच आपल्या हाती राहावी यासाठी सावंत नेहमीच आग्रही राहिल्याचे पहायला मिळाले.

सहकार क्षेत्रात पाय रोवून असलेल्या सावंत यांनी तेरणाचा ताबा घेऊन आपली शक्ती पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे. शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची नाळ जोडलेल्या कारखान्याचा सांभाळ आता सावंत करणार असल्याने त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जाते. जिल्ह्याच्या राजकारणात या निमित्ताने सावंत यांचे राजकीय वर्तुळ मोठे झाले आहे.

तेरणाच्या निमित्ताने संपुर्ण जिल्ह्यावरच सावंत यांनी आपली पकड आता मजबुत केली आहे. कायम जोखीम पत्करण्याची सावंत यांची राजकारणात तयारी असते. परिणामांची चिंता ते फार करत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तरी सावंत त्याला पुरून उरतात. तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखाना उभारणीचा पाया खोदताना सावंत यांच्या राजकारणाचा पाया देखील भक्कम होईल असे फारसे कोणाला वाटले नव्हते.

भैरवनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेला सावंत परिवार दिवसेंदिवस जिल्ह्याच्या राजकारणात पाय मजबुत करीत राहिला. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत जिल्हा परिषदेचे सभापती, उपाध्यक्ष झाले. सावंत प्रतिष्ठाणच्या नाला सरळीकरण खोलीकरणाच्या कामामुळे तसेच या योजनेला स्व. बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती हे नाव दिल्याने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासूंमध्ये सावंत यांनी स्थान निर्माण केले.

Mp Omraje Nimabalkar-Rana Patil-Tanaji Sawant
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; दोन गोळ्या झाडल्या

त्यानंतर यवतमाळ मधून विधान परिषदेची निवडणूक लढवत सांवत यांनी मोठा विजय मिळवत आपण राजकारणात देखील तरबेज असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शिवसेनेत झपाट्याने प्रगती करत त्यांनी थेट मंत्रीपदही पटकावले. त्यामुळे सहाजिकच जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाची सगळी सुत्र त्यांच्याकडे आली. शिवसेनेत जिल्ह्याच्या राजकारणात निर्णय घेताना आमदार सावंत यांचाच शब्दच प्रमाण मानला जात.

जिल्हा परिषद , जिल्हा बँक, उस्मानाबाद, परंडा नगर परिषद निवडणूकीत त्यांचीच भुमिका महत्वाची ठरली. उस्मानाबाद ,सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची उमेदवारी देतांना आमदार सावंत यांचे मत विचारात घेऊनच तिकीट दिले गेले. त्यामुळे अनेक ठिकाणी सावंत यांना पक्षांतर्गत नाराजी, रोषाला देखील सामोरे जावे लागले होते. सावंत यांच्या रोखठोक आणि जाहीर टीका करण्याच्या स्वभावामुळे त्यांने अनेक समर्थ, एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात विरोधकांप्रमाणेच पक्षांतर्गत विरोधी गटाला देखील त्यांना तोंड द्यावे लागते. कधी पक्षविरोधी भूमिका घेत त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांची देखील नाराजी सहन करावी लागली. मागील अनेक वर्ष तेरणा साखर कारखान्यावर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आलटून पालटून कमी अधिक प्रमाणात वर्चस्व राहिले आहे. हा कारखाना खासदार निंबाळकर किंवा आमदार पाटील यांच्या शिवाय कोणीच चालवू शकत नाही, असे चित्र अनेक वर्ष पहावयास मिळत होते. याला छेद देत सावंत यांनी पुढाकार घेत कारखान्यासाठी निविदा भरली.

अनेक घडामोडीनंतर सावंत यांच्याकडे या कारखान्याची सुत्रे आली आहेत. त्याच भागात जागा जमीन घेऊन नवा कारखाना उभारण्याची क्षमता सावंत यांची असतांना अडचणीत असलेला साखर कारखाना घेण्याचे मोठे धाडस त्यांनी केले. जिल्ह्याचा राजकारणावर वर्चस्व मिळविण्याचा किंवा जिल्ह्यातील नेत्यांना जे करता आले नाही ते मी करू शकतो हे कृतीतून सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने सावंत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com