Power outage flag hoisting delayed : ऐनवेळी बत्ती गूल; मंत्री, खासदार आमदार सगळेच ताटकळले...

Marathwada News : प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तत्काळ महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधला व त्यांची कानउघाडणी केली.
Parbhani Political News
Parbhani Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त परभणी शहरात चाळीस मीटरचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. (Marathwada News) यासाठी खास इलेक्ट्रिक यंत्राच्या माध्यमातून बटन दाबून ध्वजवंदनाचे नियोजन करण्यात आले होते. नवा प्रयोग म्हणून सगळ्यांनाच ध्वजवंदनाची उत्सुकता होती, पण ऐनवेळी विद्युत पुरवठा खंडित झाला आणि सगळेच ताटकळले.

Parbhani Political News
Parbhani BJP Politics : आमचेही ऐका ! भाजपच्या ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता...

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते संपन्न ध्वजवंदन होत असताना अचानक बत्ती गूल झाली आणि मग अर्धा तास सगळ्यांनाच वाट पाहावी लागली. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा अर्ध्या तासाने ध्वजवंदन करण्यात आले. (Marathwada) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शहरातील राजगोपालचारी उद्यानात भव्य चाळीस मीटर तिरंगा ध्वज फडकवण्याची तयारी करण्यात आली होती.

मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत इलेक्ट्रिक बटनच्या साह्याने हे ध्वजवंदन करण्याचे नियोजन होते. (Parbhani) जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि परभणीकर मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी जमले होते. अतुल सावे हे बटन दाबून ध्वजवंदन करणार, तोच वीज गेली.

अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. सावे यांनी अनेकदा बटन दाबून प्रयत्न केला, पण ध्वजवंदन झालेच नाही. ऐनवेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह जिल्हाधिकारी गावडे यांची धावाधाव सुरू झाली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तत्काळ महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधला व त्यांची कानउघाडणी केली.

अखेर सत्तावीस मिनिटांनंतर विद्युत पुरवठा पूर्ववत झाला आणि ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, माजी खासदार सुरेश जाधव आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या प्रकारामुळे मनपाचा गलथानपणा उघड झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com