Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंसोबत आमची युती झाली होती, मात्र..' ; प्रकाश आंबेडकरांनी अखेर सांगूनच टाकलं!

Prakash Ambedkar on Manoj Jarange : 'मनोज जरांगेंना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल, तर त्यांनी...' असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Vanchit Bahujan Aaghadi News : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज(रविवार) छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी मीडियाच्या अनेक प्रश्नांवर रोखठोक मत मांडलं. याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत केलेल्या युतीबाबतही भूमिका जाहीर केली. तसेच, सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून आंदोलन निर्माण करणारे मनोज जरांगे यांच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

'उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यासोबत आमची युती झालेली होती, मात्र ती आता तुटलेली आहे आता काहीही राहिलं नाही. त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्ही बैठक घेऊन या सगळ्या प्रश्नावरती उत्तर देऊ.' असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Prakash Ambedkar
Sanjay Shirsat On Raju Shinde : छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटालाही धक्का बसणार? ; संजय शिरसाटांनी केलंय 'हे' सूचक विधान!

याशिवाय मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले , 'मला असं वाटतं की मनोज जरंगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं. मात्र 288 जागेवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावे. फक्त एससी आणि एसटी जागा सोडून. तसेच, माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे 31 खासदार निवडून आलेले आहेत.

मराठा समाजाचे ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आता जरांगे पाटलांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एसी आणि एसटी च्या जागा सोडून इतर जागेवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत.'

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सांगितलं की, 'या संदर्भात ज्या काही दोन-चार कविता आल्या त्या फार चांगल्या आल्या आहेत. तुम्ही दीड हजार रुपये महिना दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या दीड हजारामध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळणार का?, या दीड हजारामध्ये जी महागाई वाढलेली आहे, ती पौष्टिक आहार खाऊ शकते का?'

Prakash Ambedkar
Raju Shinde: राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिंदें गटाचे आमदार शिरसाट यांची डोकेदुखी वाढणार

याशिवाय, 'उद्या चालून मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवावी ज्यामध्ये शरद पवार छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांना बोलवावं. कुणी वाद लावत आहे लावत नाही हा विषय वेगळा परंतु जरांगे पाटलांचा जो विषय आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, हा जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या संदर्भात त्यांनी बोलावं.' असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com