Prashant Bamb : मराठवाडा पदवीधरचे सतीश चव्हाण यांच्यासाठी प्रशांत बंब यांनी यंत्रणा लावली कामाला, राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचाही दावा

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा दावा आमदार प्रशांत बंब यांनी केला. गंगापूर-खुलताबादमधील पदवीधरांचे मतदान मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्याचे त्यांनी सांगितले.
MLA Prashant Bamb-Satish Chavan
MLA Prashant Bamb-Satish ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा दावा भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील संपूर्ण १२ हजार मतदान चव्हाण यांना मिळवून देण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्याचे बंब यांनी सांगितले. जुन्या राजकीय वादांना आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओंना बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युतीच्या प्रमुख नेत्यांनी सतीश चव्हाण यांची उमेदवारी ठरवली आहे. आपण महायुतीचा धर्म पाळणारे कार्यकर्ते आहोत, जुन्या गोष्टी मनात आणून किंवा जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर कोणी आपला माणूस व्हायरल करत असेल तर कृपया तसे करू नका, मला त्याची माहिती द्या. जे झालं ते झालं, ते आता काढण्याचे काही काम नाही, असे आवाहन बंब यांनी आपल्या समर्थकांना केले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पाचही विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीचे उमेदवार ठरवले आहेत. त्या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, मतदारसंघातील शंभर टक्के पदवीधरांचे मतदान हे सतीश चव्हाण यांना कसे पडेल, याची जबाबदारी आपण निश्चित केली आहे. प्रत्येकाने त्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडायची आहे. या दोन दिवसात मतदारांचा शोध घेऊन त्यांचे मतदान कसे होईल, हे संबंधितांनी पहायचे आहे, असे आवाहन बंब यांनी केले.

MLA Prashant Bamb-Satish Chavan
Latur DCC Bank : बाबासाहेब पाटलांचे जावई, निलंगेकरांचे बंधू, कराडांचे पुत्र; लातूर जिल्हा बँकेत नात्यांचे राजकारण!

बाहेरगावी गेलेल्या मतदारांना कसे आणायचे? त्याची व्यवस्था मित्र पक्षाने केली नसेल तर आपण करू, शिवसेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्याही संपर्क राहा, असे आवाहन बंब यांनी केले. ज्यांना जुन्या गोष्टी उगाळायच्या आहेत, किंवा निवडणूकीच्या महत्त्वाच्या वेळी जुने व्हिडिओ व्हायरल करून संभ्रम निर्माण करायाचा आहे,अशांनी घरात बसावे, त्यांनी काम केले नाही तरी चालेल, असा दमही बंब यांनी दिला.

MLA Prashant Bamb-Satish Chavan
Yusuf Pathan news : पक्षांतर करणाऱ्या बंडखोर खासदाराला गुजरातमध्ये लॉटरी; तब्बल 14 वर्षे वादात असलेली सरकारी जमीन देण्याचा निर्णय

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण हे राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून येणारे उमेदवार ठरतील. माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदार संघात असलेले संपूर्ण बारा हजार मतदान त्यांना पडेल, त्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. महायुतीच्या पाच उमेदवारांमध्ये चव्हाण यांचे मताधिक्य सर्वात जास्त असेल असा दावा, भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघातील पदवीधरांच्या मेळाव्यात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com