Pratap Patil Chikhlikar News : अजून मी भाजपाला हात घातलेला नाही! चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना सूचक इशारा!

Pratap Patil Chikhlikar gives a subtle warning to Ashok Chavan, stating that he has not yet shifted focus to the BJP. : ज्यांना पराभूत करून मी खासदार झाले, ते पक्षात आल्यानंतर माझा पराभव झाला, अशी सलही चिखलीकर यांनी बोलून दाखवली.
Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांची ही खेळी कमालीची यशस्वी झाली अन् राष्ट्रवादीलाही जिल्ह्यात तगडा नेता मिळाला. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील राजकीय वैर सगळ्या जिल्ह्याला माहित आहे.

अजित पवारांनी हे हेरले आणि चिखलीकर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लावला. आता हाच मासा इतर पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणून नांदेड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर, त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर आणि काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा असे चव्हाण यांचे सगे-सोयरे आणि काँग्रेसमधील समर्थक राष्ट्रवादीत आणत चिखलीकरांनी आपलेही राजकीय वजन वाढवून घेतले.

खतगावकर, पोकर्णा यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी जोरदार भाषण केले. भाजपामध्ये माझे काही हितचिंतक आहेत, त्यांना माझी जरा जास्तच काळजी असते. पण त्या पक्षात माझेही समर्थक आहे, अजून मी भाजपाला हात घातला नाही, पण माझ्या नादाला लागलात तर सोडणार नाही, असा सूचक इशारा प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना नाव न घेता दिला. ज्यांना पराभूत करून मी खासदार झाले, ते पक्षात आल्यानंतर माझा पराभव झाला, अशी सलही चिखलीकर यांनी बोलून दाखवली.

Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत येणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतील, आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही! अजितदादांचा वादा..

आता कुठेही जाणार नाही, फक्त घड्याळच..

पण कदाचित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी विधानसभेवर आमदार म्हणून जावं, अशी नियतीची इच्छा होती, म्हणून मी राष्ट्रवादीत आलो. आता सगळे पक्ष फिरून झाले, यापुढे कुठल्याही पक्षात जाणार नाही, आता राष्ट्रवादीतच राहणार. मनगटावर बांधलेलं घड्याळ आता, काढायचं नाही, असेही चिखलीकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या एवढी वाढली आहे, की अजितदादांना नांदेडमध्ये वारंवार यावे लागणार आहे.

Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Bhaskarrao Patil Khatgaonkar Join Ncp : अजितदादा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो! पक्षप्रेवश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा..

मी अधिवेशन कधी बुडवत नाही, पण नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला इतका प्रतिसाद मिळतो आहे, रोज माझ्या घरी, कार्यालयावर इतर पक्षातले पदाधिकारी, कार्यकर्ते येत आहेत. आमचा पक्षप्रवेश करून घ्या, पण अजितदादांनाच बोलवा, असे म्हणत आहेत. त्यामुळे मी अधिवेशनात माझी फक्त पन्नास टक्केच हजेरी होती, अशी कबुली प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. अशोक चव्हाण कळायला ओमप्रकाश पोकर्णा यांना बराच वेळ लागला, मला ते 2004 मध्येच कळले होते, असा टोलाही चिखलीकर यांनी यावेळी लगावला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com