Pratap Chikhlikar News : लोकसभेतील पराभवानंतर आता प्रतापराव चिखलीकर पुन्हा निवडणूक लढवणार; मतदारसंघही ठरला !

Political News : नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
Pratap Patil chikhliakr
Pratap Patil chikhliakr Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन होऊन आठच दिवस झाले आहेत. त्यानंतर आता येत्या काळात होणार असलेल्या लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी इच्छुक करीत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

आगामी काळात होत असलेली ही पोटनिवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी केली आहे. सध्या या जागेसाठी महायुतीतील भाजपकडे (Bjp) अनेक जण इच्छुक आहेत. दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Chikhlikar)निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नुकत्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागले आहे. (Pratap Chikhlikar News)

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं 26 ऑगस्टला निधन झालं होते. त्यामुळे 5 सप्टेंबरला काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी नांदेड येथे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. वसंत चव्हाण यांच्या कुटुंबाशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्याकडे काँग्रेसच्या नेतेमंडळींचे लक्ष असणार आहे.

वसंतराव चव्हाण यांचे निधन होऊन एक आठवडा लोटला आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा होत असली, तरी काँग्रेस किंवा भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये ‘उमेदवारी’संदर्भात कोणत्याही नावाची अद्याप चर्चा नाही. या जागेवर काँग्रेसकडून वसंतरावांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण हे काँग्रेसतर्फे पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार यावरून बरेच काही अवलंबुन आहे.

Pratap Patil chikhliakr
Mahayuti News : महायुतीच्या बैठकीत 173 जागांवर एकमत; जागावाटपाची 10 सप्टेंबरला होणार घोषणा; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच नंदिग्राम मित्रमंडळाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यास माजी खासदार प्रताप चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. चिखलीकर यांनी दानवे यांच्यासमोरच लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

छत्रपती संभाजीनगरातील या मेळाव्याचे आयोजन चिखलीकर व त्यांच्या परिवाराच्या नियोजनातून करण्यात आले होते. दानवे यांना आमंत्रित करण्यात त्यांचाच पुढाकार होता. नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना न बोलवता त्यांनी दानवे, खासदार भागवत कराड यांना निमंत्रण दिले होते.

Pratap Patil chikhliakr
Mahayuti News : महायुतीच्या बैठकीत 173 जागांवर एकमत; जागावाटपाची 10 सप्टेंबरला होणार घोषणा; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

चिखलीकर यांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून लोहा-कंधार मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत होते. या दरम्यान त्यांनी स्वतः तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य आणि राजकीय वर्तुळातील चर्चा यावरून चिखलीकर भाजपसोडून पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेस पक्षात जातील, असा अंदाज वर्तविला जात होता, पण खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय स्थितीत चिखलीकर यांनी भाजपकडे दोन्हींपैकी कोणतीही निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.

1987 च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होणार का ?

नांदेड लोकसभा मतदारसंघात 1987 साली लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा काँग्रेसने पुन्हा जिंकली होती. त्यानंतर सुमारे 38 वर्षांनी नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून काँग्रेसने दिवंगत वसंतरावांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उभे केले पाहिजे, असा सर्वसाधारण सूर असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही जागा पुन्हा काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे. त्यांना या निवडणुकीत सहानभुतीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

Pratap Patil chikhliakr
MVA News : जागावाटपावरून 'मविआ'च्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, 'काही गोष्टी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com