Marathwada Political News : कन्नड विधानसभेच्या `हाय व्हाेल्टेज` लढतीची तयारी...

Kannad-Soygaon Constituency : संजना जाधव यांनी गेल्या दीड-दोन वर्षांपासून मतदारसंघात संपर्क वाढवला आहे.
Marathwada Political News
Marathwada Political News Sarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : मराठवाड्यातील कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये एक `हाय व्हाेल्टेज`, लढत होणार आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील. (Kannad-Soygaon Constituency) कौटुंबिक वादानंतर स्वतंत्र मार्गावर निघालेल्या तालुक्यातील या दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Marathwada Political News
Abdul Sattar News : मेळाव्याचे निमंत्रण द्यायला गेले अन् सत्तारांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले...

संजना यांना वडील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भक्कम पाठबळ आणि भाजपच्या मजबूत संघटन बांधणीची साथ मिळणार आहे, तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपल्या आक्रमक स्वाभावाला साजेसे काम मतदारसंघात सुरू केले असून, शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या प्रश्नावर ते रस्त्यावर उतरले आहेत.

दोन टर्म हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांच्या `बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल`, या कार्यशैलीचा मोठा चाहता वर्ग (Kannad) कन्नड-सोयगाव मतदारसंघात आजही आहे. (BJP) वडील दिवंगत रायभान जाधव यांनी केलेल्या विकासकामांची पुण्याई, आई तेजस्विनी जाधव यांनी एक टर्म बांधून ठेवलेला मतदारसंघ या जोरावर हर्षवर्धन यांनी दोनदा या मतदारसंघांतून विजय मिळवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघाकडे आता पूर्ण लक्ष

त्यामुळे जाधव यांचे तगडे आव्हान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यासह संजना जाधव यांनाही असणार आहे. संजना जाधव यांनी गेल्या दीड-दोन वर्षांपासून मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. जिल्हा परिषद सदस्य राहिल्यामुळे त्यांचा पिशोरसह तालुक्यात संपर्क होताच, पण मध्यंतरी तो कमी झाला होता. नागरिकांच्या प्रश्नावर मोर्चा काढत संजना यांनी तालुक्याच्या राजकारणात कमबॅक करण्याचे संकेत तेव्हाच दिले होते. आता विधानसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलेले असताना संजना यांनी आता पूर्णवेळ कन्नड-सोयगाव मतदारसंघाकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे.

याचाच एक भाग म्हणून विजयादशमीच्या दिवशी कन्नड शहरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तालुक्यातील संत-महंताच्या उपस्थितीत केले जाणार आहे. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण संजना जाधव यांच्याकडून समर्थकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले जात आहे. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त संजना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील काळात या मतदारसंघात हर्षवर्धन विरुद्ध संजना असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com