Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवू शकणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांचे घातले श्राद्ध

Protest against all political parties who cannot solve the Maratha reservation issue : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक वर्षापूर्वी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. या आंदोलकांवर लाठीचार्ज करत गोळीबार करण्यात आला होता.
Protest For Maratha Reservation
Protest For Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Maratha Reservation News : ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाला उद्या (ता.29) एक वर्ष पुर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात एकाही राजकीय पक्षाला यश आले नाही, याचा निषेध म्हणून आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात सगळ्याच राजकीय पक्षांचे श्राद्ध घालत सकल मराठा समाजाने निषेध नोंदवला.

यावेळी सगळ्याच राजकीय पक्षांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Maratha Reservation) या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 आॅगस्ट 2023 मध्ये आंदोलनाला सुरवात झाली होती.

या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी, आंदोलने, संवाद दौरे, अंतरवाली ते मुंबईच्या दिशेने मोर्चा, रास्ता रोको, राजकीय नेत्यांना गावबंदी अशा पद्धतीने मराठा समाजाने रस्त्यावर उतरत लढा दिला.

पण आरक्षणासाठीच्या आंदोलनाला एक वर्ष होऊनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर केवळ राजकारण केले. याचा निषेध म्हणून निलंगा येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांचे श्राद्ध घालत निषेध नोंदवला. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवला नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वच राजकीय पक्षाचे श्राध्द घालण्यात आले.

Protest For Maratha Reservation
Maratha Reservation: सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी! आरक्षण मिळत नसल्यानं मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडेंची आत्महत्या

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक वर्षापूर्वी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. (Manoj Jarange Patil) या आंदोलकांवर लाठीचार्ज करत गोळीबार करण्यात आला होता.

सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते, महिला, पुरूष यात गंभीर जखमी झाले होते. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांकडूनच गालबोट लावण्यात आले.

मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचा लढा कायम ठेवत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा झटका दिला. आता आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असताना भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या सर्वच पक्षांनी आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही.

Protest For Maratha Reservation
Manoj Jarange: Video लाडक्या भाच्याच्या आरक्षणाचं, दाजींच्या शेतमालाचं काय? जरांगेंची सरकारला विचारणा

म्हणून निलंगा येथील सकल मराठा समाजाने सगळ्या प्रमुख पक्षांच्या चिन्हाचे बॅनर तयार करून श्राध्द घालत आंदोलन केले. कोणत्याही पक्षाने आमचा प्रश्न सोडवला नाही म्हणून सर्वच पक्षाच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते या आंदोलनाता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com