Protest Against Supply Officer: पाण्यात उभे राहत पुरवठा अधिकाऱ्याविरोधात आंदोलन..

Marathwada News: कन्नड तालुका पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करा, त्याची बदली करा,सर्वांना रेशन मिळाले पाहिजे, अशी मागणी.
Protest Against Supply Officer News
Protest Against Supply Officer NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : ऐकावे ते नवलच म्हणतात ते काही खोटे नाही. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी लोक कसे आणि कुठे आंदोलन करतील याचा काही नेम नाही. (Protest Agianst Supply Officer News) कन्नड तालुक्यातील काही आंदोलकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या विरोधात थेट छत्रपती संभाजीनगर शहरात येवून सलीम अली सरोवरात गुडघ्यावर उभे राहात आंदोलन केले. दोन तास चाललेल्या या आंदोलनाने पोलिस आणि प्रशासनाची ऐन उन्हात चांगलीच पळापळ झाली.

Protest Against Supply Officer News
Fake Educational Certificate Scam : नापासांना केलं पास,दहावी-बारावीची बनावट सर्टिफिकेट केली तयार; बोर्डाची खोटी वेबसाईटही बनवली

समजूत काढून देखील आंदोलक पाण्यातून बाहेर यायला तयार नव्हते. (Kannad) जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी स्वतः येवून चर्चा करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. (Aurangabad) त्यानंतर तहसिलदारांसह जिल्हा पुरवठा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांच्या मागण्या मान्य करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर अडीच तास चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कन्नड तालुक्यातील मकरंद पुर येथील आंदोलकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये सलीम अली सरोवरात गुडघ्यावर पाण्यात उभे राहून आंदोलन सुरू केल्याने याची चर्चा शहरात पसरली. (Marathwada) दुपारी बारा वाजेपासून हे आंदोलन सुरू होते. पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तरी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले या चर्चेसाठी आल्या पाहिजेत असा आग्रह आंदोलकांनी धरला होता.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय चव्हाण घटनास्थळी दाखल दाखल झाले. तोपर्यंत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना पाण्याच्या बाहेर येण्याचे आवाहन केले. हा सगळा प्रकार पाहण्यासाठी बघ्याची देखील मोठी गर्दी जमली होती. उदय गवळी, सादीक शेख यांच्यासह इतर या आंदोलनात सहभागी झाले होते.

कन्नड तालुका पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करा, त्याची बदली करा आणि सर्वांना रेशन मिळाले पाहिजे, अशी मागणी आंदोलक करत होते. तहसीलदार विजय चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले हे घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com