
Marathwada : गेल्या २४ वर्षांपासून बाजार समितीचे (Purna Market Committee) सभापती असलेल्या बालाजी देसाई , माजी सभापती वासुदेव नवघरे व उपसभापती असलेल्या लक्ष्मण बोबडे यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. दिग्गजांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे पुर्णा बाजार समिती निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतील नामनिर्देशन पत्रांची गुरुवारी (ता. ६) छाननी करण्यात आली. (Parbhani) त्यात १७ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. (Marathwada) अवैध ठरवलेल्या उमेदवारात सभापती बालाजी देसाई, उपसभापती लक्ष्मणराव बोबडे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे या मातब्बरांच समावेश आहे.
त्यांनी या निर्णया विरोधात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपील करत दाद मागितली आहे. यांच्या व्यतिरिक्त बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव नवघरे व माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत कदम यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
वैध नामनिर्देशन पुढील प्रमाणे सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण - ५८, महिला राखीव - १७, ईतर मागासवर्ग- ९, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्ग- ८ असे एकूण १६३ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण - २८, अनुसूचित जाती व जमाती- १२, दुर्बल घटक- १०, व्यापारी मतदारसंघ -१२, हमाल मापारी मतदारसंघ -९ असे एकूण १६३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
तर सहकारी संस्था मतदार संघ -१४ , ग्रामपंचायत-३ असे एकूण १७ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधव बोथीकर यांनी दिली. सोसायटी मतदारसंघात ११ जागा असून ६४४ मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागांसाठी निवडणूक होणार असून ४६७ मतदार आहेत. व्यापारी महासंघात दोन जागा असून ३२१ मतदार आहेत. हमाल मापारी मतदारसंघात एक जागा असून २०६ मतदार आहेत. अशा १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.