राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, सभेत वेडवाकड करायला आलेल्यांना तिथेच ठोका

हा विषय केवळ संभाजीनगरपुरता मर्यादित नाही, माझ्या पुढच्या सभा संपूर्ण मराठवाड्यात होणार.
  Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बहुचर्चित औरंगाबाद येथील सभेला सुरूवात झाली आहे. त्यांच्या या सभेला मोठी गर्दी झाली असून यावेळी सभेच्या सुरूवातीला राज ठाकरे यांनी उपस्थितांना शांत बसण्याचे आवाहन केले. तेव्हा गोंधळ सुरूच होता. त्यावेळी त्यांनी कुणी जर या सभेत काही वेडवाकड करायला आल असेल तर त्यांना तिथेच ठोका, असा आक्रमकपणे थेट आदेशच राज ठाकरेंनी दिला. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राज आजच्या सभेतून काय बोलणार आणि कुणाल लक्ष्य करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

  Raj Thackeray
भगव्या शालीवरून मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले...

राज ठाकरेंच्या सभेला सुरूवात झाली असून त्यांनी सुरूवातीलाच महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भाषणाला सुरूवात केली. खरतर सभा होणार नाही. सभा घ्यावी की न घ्यावी ही गोष्ट का केली गेली माहिती नाही. कुठेही सभा घेतली असती तरी लोकांनी बघीतलीच असती. खरतर मी दोनच सभा घेतल्या. मात्र या दोन सभांवर किती बोलत आहेत. ज्यावेळी ठाण्यातील सभा झाली, तेव्हा दिलीप धोत्रेने मला फोन केला. त्यांनी सागितलं साहेब आपण संभाजीनगरला एक सभा घेऊया. त्याला मी बोललो आपण सभा घेऊ मी तारीख सांगतो. मात्र आता हा विषय केवळ संभाजीनगरपुरता मर्यादित नाही, माझ्या पुढच्या सभा संपूर्ण मराठवाड्यात होणार. तसेच विदर्भात ही जाणार, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महारष्ट्रात ही जाणार असून राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार असे स्पष्ट केले. या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, सभेला सुरूवात झाल्यावर काही काळ गोंधळ सुरु होता. तेव्हा राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, जर कुणी या सभेत काही वेडवाकड करायला आले असेल तर त्यांना तिथेच ठोका. ही सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे हे विसरू नका चौरंग केला जाईल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. यानंतर वातावरण चांगलेच तापले होते.

  Raj Thackeray
video : 'मी झेडपीचा सदस्य नव्हतो, पण सभागृहात होतो'

राज म्हणाले, संभाजीनगरचं मूळ नाव हे खडकी आहे. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच आहेत. एक देवगिरीचा किल्ला आणि दुसरी पैठण. आजचा महाराष्ट्र दिन साजरा करताना आधी महाराष्ट्र समजून घ्यायला हवा. -छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला आणि त्यानंतर औरंगजेब हा महाराष्ट्रात1681 मध्ये आला आणि तो 27 वर्ष इथे थांबून इथेच 1707 ला महाराष्ट्रातच मेला. औरंगजेबाने जी पत्रं पाठवली त्यात तो कोणाचाही उल्लेख करत नाही, फक्त लिहितो की शिवाजी अजूनही मला येथे छळतो. तो लढणाऱ्या प्रेरणेला शिवाजी म्हणतो. त्याला कळलं होतं की शिवाजी व्यक्ती नाही, तर एक विचार आहे. हा विचार या भूमीत पसरला तर आपलं खरं नाही हे त्याला माहिती होते. याचबरोबर राज ठाकरेंनी राज्यात चाललेल्या राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com