Raj Thackearay News : राज ठाकरेंचा दुसरा मराठवाडा दौरा, पण संभाजीनगरातील उमेदवारांबद्दलचा सस्पेंस कायम..

Raj Thackeray's second visit to Marathwada, but suspense over Sambhajinagar candidates remains : उमेदवारीची घोषणा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांचा मात्र यामुळे हिरमोड झाला. मराठवाड्यातील विधानभेच्या 46 मतदरासंघाचा आढावा घेण्यासाठी आज राज ठाकरे शहरात आले होते.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Political News Marathwada : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दुसरा मराठवाडा दौरा आज पार पडला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्याच्या मोजक्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत ठाकरेंनी मतदारसंघाचा आढावा घेतला. आपल्या पहिल्याच दौऱ्यात राज ठाकरे यांनी 7 आॅगस्ट रोजी लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात बंडु कुटे यांच्या नावाची घोषणा केली होती.

मनसेने आतापर्यंत सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. संभाजीनगरमध्येही राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती, मात्र जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. आज राज ठाकरे (Raj Thackeray) संभाजीनगरमधील मनसे उमेदवारीची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र आजही राज ठाकरे यांनी फक्त मराठवाड्यातील सर्व विधानसभा मतदरासंघाचा आढावा घेतला आणि ते नाशिक दौऱ्यासाठी निघून गेले.

उमेदवारीची घोषणा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांचा मात्र यामुळे हिरमोड झाला. मराठवाड्यातील विधानभेच्या 46 मतदरासंघाचा आढावा घेण्यासाठी आज सकाळीच राज ठाकरे शहरात दाखल झाले होते. साडेनऊ वाजेपासून सुभेदारी या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या. यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे हे ही होते.

Raj Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरे भडकले; म्हणाले, 'मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून...'

प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी 25-30 प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी चर्चा केली. आठही जिल्ह्यातील पक्षाचे निरीक्षक या बैठकीला बोलावण्यात आले होते. (Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड,परभणी,लातूर,धाराशिव,नांदेड आणि हिंगोली अशा क्रमाने बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी पावनेतीन पर्यंत जिल्हानिहाय बैठका सुरू होत्या. त्यानंतर काहीकाळ हाॅटेलला थांबून राज ठाकरे नाशिककडे रवाना झाले.

मनसेचे जाहीर झालेले सात उमेदवार

राज ठाकरे यांच्या आॅगस्टमधील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या दौऱ्यात एकूण सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यात बाळा नांदगावकर- शिवडी, दिलीप धोत्रे- पंढरपूर-मंगळवेढा, संतोष नागरगोजे- लातूर ग्रामीण, हिंगोली- बंडू कुटे, सचिन भोयर- राजूरा (चंद्रपूर जिल्हा), मनदीप रोडे- चंद्रपूर आणि राजू उंबरकर -वणी (यवतमाळ जिल्हा) यांचा समावेश आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com