Rajesaheb Deshmukh : 'परळीतील सर्वच घटक दहशतीखाली,आपण विधानसभा लढविणारच' ; काँग्रेसच्या देशमुखांनी हाबुक ठोकली!

Rajesaheb Deshmukh on Parli Assembly Election : मागच्या वर्षी राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे आता परळी केंद्रस्थानी आली आहे.
Rajesaheb Deshmukh
Rajesaheb DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : परळी वैजनाथ मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बबन गिते यांच्यानंतर राजाभाऊ फड इच्छुक असताना आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनीही परळीतून लढणारच अशी हाबुक ठोकली आहे.

परळी शहरात कायद्याचे राज्य नाही, शिक्षणाच्या सोयी व रोजगार नाही असा आरोप करत अधिकारी, नोकरदार, व्यापारी, महिला, मुली, विद्यार्थी, अल्पसंख्यांक हे सर्व घटक दहशतीखाली जीवन जगत असून शहरातील श्रीमंत, ऐपतदार लोक अंबाजोगाई, लातूर, पुणे येथे कुटुंबासह स्थलांतरित झाल्याचा घणाघातही त्यांनी केला.

परळीचा सर्वांगीण विकास व प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सर्व धर्मीय सर्वसामान्य माणूस यांना सुख समाधान आनंदी व भयमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.

Rajesaheb Deshmukh
Laxman Hake News : 'मराठा आरक्षण म्हणजे राजकीय वर्चस्वासाठी घातलेला घाट' ; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप!

पुर्वीच्या आघाडीत जिल्ह्यातील बीड, केज, माजलगाव, गेवराई आणि आष्टी हे विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर एकमेव परळी कॉंग्रेस पक्षाला असे. पंरतु, 2019 च्या निवडणुकीत ही एकमेव जागा देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी कॉंग्रेसकडून खेचून घेतली. धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचा येथून पराभव केला.

मागच्या वर्षी राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे आता परळी केंद्रस्थानी आली आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय ताकदवान असलेले भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र असूनही या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्याविरोधात शरद पवार कोणाला उतरविणार याकडे लक्ष आहे. या पक्षाकडून अगोदर बबन गित्ते इच्छुक होते. त्यात मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. फड हे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. परळीत लढत देण्यासाठी साम साम - दाम - दंड - भेद वापरणाराच उमेदवार लागणार आहे. यात आता कॉंग्रसेचे राजेसाहेब देशमुख यांनी उडी घेतली आहे.

राजेसाहेब देशमुख हे कॉंग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांचे विश्‍वासू आहेत. लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी विजयानंतर महाविकास आघाडीवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास वाढल्याचा त्यांचा दावा आहे.

Rajesaheb Deshmukh
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंनी 'बाण' ताणला शिवसेनेवर, पण घायाळ झाले भाजप अन् राष्ट्रवादीचे नेते!

जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस(Congress) पक्षाकडे समविचारी पक्ष व संघटनेतील नेते आणि कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे. बारामती, लातूर, पुणे शहराच्या धर्तीवर परळी शहरासह मतदारसंघाचा विकास करुन मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आपण निवडणूक लढवावी अशी मतदारसंघातील सर्वधर्मीय मतदार आणि सर्वसामान्य माणसाची इच्छा असल्याने त्यांच्या भावनेचा आदर करून श्री क्षेत्र प्रभु वैद्यनाथांच्या नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडणुक लढणार असल्याचे ते म्हणाले. नेहमीच परळीकरांच्या आशिर्वादावर केवळ स्वतःच मोठे झालेल्यांना सलग सत्तेत राहून ही परळीचा विकास करता येवू नये ही मोठी शोकांतिका असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com