दत्ता देशमुख

२००२ पासून पत्रकारितेत. २०११ पासून बीड येथे ‘सकाळ’मध्ये वरिष्ठ बातमीदार. तत्पुर्वी ‘सकाळ’, पार्श्वभूमी, लोकाशा, चंपावतीपत्र व लोकमत या दैनिकांत उपसंपादक व वार्ताहर म्हणून कामाचा अनुभव. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आरोग्य या विषयांवर वार्तांकन व विश्लेषणाचा अनुभव. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’ या राजकीय वेब पोर्टलच्या सुरुवातीपासून लिखाण करत आहे. राजकीय घडामोडींचे विश्लेषणाबरोबर राज्यस्तरीय अचुक राजकीय अंदाज मांडण्यात अधिक रस. ‘सकाळ’तर्फे शोध व परिणामकारक पत्रकारितेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. ना. भी. परुळेकर पुरस्काराने दोनदा सन्मान. यासह पत्रमहर्षी मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद आदी विविध पुरस्कारांनी सन्मान. विज्ञान पदवीसह पत्रकारितेतील पदविका, पदवी तसेच राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी.
Connect:
दत्ता देशमुख
Read more