जालना : राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे, ही पुर्णपणे संपली असं माझ वैयक्तिक मत आहे, आता काळजीचा विषय नाही, अशा शब्दात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जनतेला विश्वास दिला. कोरोनाची लाट आटोक्यात असली तरी संपुर्ण मास्क मुक्तीचा निर्णय घेणार नाही. (Health Minister) हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला जाईल, याबाबत घाईने कुठलीही पावले उचलली जाणार नाहीत, असेही टोपे म्हणाले. (Marathwada)
जालना येथे बोलतांना टोपे यांनी प्रसार माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. टोपे म्हणाले, सध्या राज्यात ९ हजार कोरोना रुग्ण असून आधी कोरोना बाधितांची दररोजची संख्या ४८ हजारापर्यंत होती. आता हा आकडा खूप खाली आला आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता चिंतेचा विषय नक्कीच नाही, तिसरी लाट संपली असं माझं वैयक्तिक मत आहे.
पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परीणाम भोगले त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करत आहोत, मात्र मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाई करून चालणार नाही, हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल. राज्यातील नागरीकांना सरसकट बूस्टर डोस देण्यात यावा, अशी कोणतीही मागणी राज्याच्या टास्क फोर्सने केलेली नाही.
बूस्टर डोस नागरीकांना देण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्या प्रमाणे नागरीकांना बूस्टर डोस दिला जाईल असंही टोपे म्हणाले. मुंबईत कोरोनावरील दीड लाख डोसची एक्सपायरी डेट जवळ आल्याने आरोग्य विभागासमोर हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर त्या बाबतचा निर्णय घेतला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.