Maratha Reservation : शिंदे-पवारांच्या नेत्यांना धगधगत्या मराठा आंदोलनाची झळ; टोपे, बांगरांवर ओढवली 'ही' वेळ

Rajesh Tope, Santosh Bangar hit by Maratha community movement : गाव बंदीचा फटका नुकताच माजी मंत्री राजेश टोपे व शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना बसला आहे.
Rajesh tope, santosh bangar
Rajesh tope, santosh bangar
Published on
Updated on

Jalna Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील काही गावांनी नेतेमंडळींना गावबंदी केली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी कायम राहणार आहे. या गाव बंदीचा फटका नुकताच माजी मंत्री राजेश टोपे व शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना बसला आहे.

Rajesh tope, santosh bangar
Jarange Vs Bhujbal : ''जोडायची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही; हेकेखोरपणानं तुम्ही...'' जरांगेंचा भुजबळांवर पलटवार!

राज्यातील मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर अंतरवाली सराटीत मनोज जरांगे-पाटलांनी (manoj jarnge Patil) दोन वेळा उपोषण केले. यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने दोन वेळा वेळ घेतला. आता नव्याने दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपणार आहे. त्यातच सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यभर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी नेतेमंडळींना गावबंदी करण्यात आल्याने त्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. जालना जिल्ह्यातील सिध्देश्वर पिंपळगांव येथे एका कार्यक्रमासाठी माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)हे गेले होते. यावेळी मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राजेश टोपे यांना कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला.

Rajesh tope, santosh bangar
Maratha Reservation: शिंदे समिती रद्द करा; छगन भुजबळांची मोठी मागणी

हिंगोली जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावरही कार्यक्रमातून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली. आमदार संतोष बांगर यांना मराठा समाजाच्या तरुणाने काळे झेंडे दाखवले. आमदार बांगर एका खासगी कार्यक्रमासाठी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमध्ये आले होते. कार्यक्रम उरकून जाताना शेवाळा रोडवर मराठा तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. या पूर्वी एक वेळा त्यांच्या वाहनासमोर घोषणाबाजी करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajesh tope, santosh bangar
Vijay Wadettiwar : " येणार...येणार म्हणाले, पण आलेच नाही, ओबीसी मेळाव्याला वडेट्टीवारांनी का मारली ऐनवेळी दांडी ?

यांनाही रोषाला जावे लागले सामोरे

दुसरीकडे जालना जिल्ह्यात नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या आंदोलनाचा फटका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यांना बसला आहे. भाजपचे जेष्ठ नेते भास्कर पाटील दानवे यांना मराठा समाज आरक्षण आंदोलन समन्वय समितीच्या बैठकीतून बाहेर जावे लागले. या मराठा समाजाच्या आंदोलन व घोषणाबाजीमुळे नेतेमंडळींना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Rajesh tope, santosh bangar
Rajesh Tope News : टोपेंचा `दिवाळी पाडवा` कार्यक्रमही रद्द...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com