Rajesh Tope News : टोपेंचा `दिवाळी पाडवा` कार्यक्रमही रद्द...

Marathwada Political News : पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
Rajesh Tope News
Rajesh Tope NewsSarkarnama
Published on
Updated on

Rajesh Tope News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आक्रमक आंदोलन करत राजकीय नेत्यांना गावबंदीही केली. (Jalna Political News) ठिकठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या. मराठा विरुद्ध ओबीसी असा वादही पेटला आहे.

Rajesh Tope News
Raosaheb Danve Diwali News : रावसाहेब दानवे फडणवीसांना सुतळी बाॅम्ब का म्हणाले ?

या पार्श्वभूमीवर जालन्यातील अनेक नेत्यांना दीपावली स्नेहमिलने कार्यक्रम रद्द केले. माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली `दिवाळी पाडवा` स्नेह मिलन कार्यक्रमाची परंपरा यंदा खंडित केली, अर्थात त्यामागे कारणही तसेच आहे. (NCP) राजेश टोपे यांनी स्वतः हा कार्यक्रम रद्द करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

`दीपावली पाडवा' स्नेह मिलन कार्यक्रम कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेली परंपरा. या शुभ दिवशी असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, आप्तेष्ट, मित्र मंडळी पाथरवाला बु. येथे भेटीसाठी येत असतात. (Marathwada) प्रेम आणि विचारांची देवाणघेवाण करणारी ही परंपरा साहेबांनंतरही आपण निष्ठेने पुढे चालु ठेवलेली आहे.

परंतु या वर्षाची परिस्थिती वेगळी आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यातील सर्व मंडळात आपण दुष्काळ घोषित करून घेतलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. हे सर्व मुद्दे हाताळण्यास शासन अपयशी ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर `दीपावली पाडवा` स्नेह मिलन साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही.

दरवर्षीप्रमाणे होत असलेला `दीपावली पाडवा' स्नेह मिलन कार्यक्रम या वर्षापुरता रद्द करण्यात येत असल्याचे टोपे यांनी फेसबुकवरून जाहीर केले आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांना दीपावली स्नेहमिलन रद्द केले आहे. तर माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह काही नेतेमंडळींनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे यावर्षी आयोजनच केले नाही. त्यामुळे यावर्षी स्नेहमिलनातून होणारी राजकीय टोलेबाजीला त्यांचे चाहते मुकणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com