Ramdas Athawale News : महायुतीला आमच्यामुळे फायदा ; रिपाइंचा विधानसभेच्या नऊ जागांवर दावा

Ramdas Athawale's RPI want nine seats in the Vidhan Sabha and one in the Legislative Council : मला मंत्रिपदाची गरज नाही, परंतू समाजासाठी मंत्रीपद आवश्यक आहे. मी समाजासाठीच मंत्री पदावर आहे. रिपाइंच्या कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा आहेत.
Ramdas Athawale News
Ramdas Athawale NewsSarkarnama
Published on
Updated on

RPI (A) Political News : रिपाइंमुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. महायुतीला त्याचा मोठा फायदाच झाला आहे. असे असतानाही मात्र रिपाइं कडे दुर्लक्ष केले जात आहे. आता मात्र विधानसभेला तीनही पक्षांनी प्रत्येकी तीन प्रमाणे आम्हाला नऊ जागा दिल्याच पाहिजे, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

लोकसभा निवडणूकीत रिपाइंमुळे महायुतीच्या सतरा जागा निवडून आल्या आहेत. (Ramdas Athawale) रिपाइंमुळे महायुतीला मोठा फायदा होत असल्याने आता विधानसभेत छत्रपती संभाजीनगर मध्य, फुलंब्री, देगलुर (नांदेड), कळंब (धाराशिव) यासह किमान नऊ जागा मिळाल्या पाहिजेत. याशिवाय एक विधानपरिषद आणि तीन महामंडळे देण्याची मागणीही आठवले यांनी संभाजीनगरात पत्रकरांशी बोलताना केली आहे.

मला मंत्रिपदाची गरज नाही, परंतू समाजासाठी मंत्रीपद आवश्यक आहे. मी समाजासाठीच मंत्री पदावर आहे. रिपाइंच्या कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा आहेत. म्हणूनच कार्यकर्त्यांनाही सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे. इंदूमिल येथील स्मारकाचे सत्तर टक्के काम पुर्ण झाले असून, पुतळा उभारण्यास आणखी दोन वर्ष लागतील.

Ramdas Athawale News
Ramdas Athawale offer to Prakash Ambedkar : रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिली मोठी ऑफर, म्हणाले...

साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचा चबुतरा, असा हा महाकाय पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतरचा देशातील दुसरा पुतळा असणार आहे. (Marathwada) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे काम पुर्णत्वास जात असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. शहरातील बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहाराला नोटीस दिली असल्याने आठवले यांनी सकाळीच विहाराला भेट दिली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा केली. सदर वास्तूला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले. मुळात ही जागा वनविभागाची असून मुख्यमंत्री या बाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ramdas Athawale News
Ramdas Athawale : आठवलेंनी काश्मीरमध्ये घडवला इतिहास; RPI च्या ‘या’ महिला उमेदवाराचीच सर्वत्र चर्चा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष उभारी घेऊ शकला असता आणि बाबासाहेबांना काही दहा ते पंधरा वर्ष आयुष्य मिळाले असते तर ते पंतप्रधान झाले असते, असे आठवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com