Ramdas Athawale : आठवलेंनी काश्मीरमध्ये घडवला इतिहास; RPI च्या ‘या’ महिला उमेदवाराचीच सर्वत्र चर्चा...

Jammu and Kashmir Assembly Election 2024 Daisy Raina : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही काश्मीरच्या निवडणुकीत उमेदवार उतरवले आहेत.
Daisy Raina, Ramdas Athawale
Daisy Raina, Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 जागांवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे. केंद्रात एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. एका जागेवर त्यांनी उमेदवार उतरवला असून इतर ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला आहे.

आठवले यांनी पुलवामातील राजपोरा मतदारसंघात एका महिलेला उमेदवारी दिली आहे. डेजी रैना असे त्यांचे नाव असून राज्यभरात त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. यामागचे कारणही मोठे आहे. डेजी रैना या मागील तीन दशकांतील पहिल्या महिला कश्मिरी पंडित आहेत, ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काश्मीरमध्ये निवडणूक लढवत असलेल्या नऊ महिलांपैकी त्या एक आहेत.

Daisy Raina, Ramdas Athawale
Devendra Fadnavis : फडणवीसांचे मुंबई पालिका आयुक्तांना आदेश; भरतीवरून आंदोलन पेटण्याआधीच खबरदारी

पुलवामा हा भाग कधीकाळी हिज्बुल मुजाहिदीनचा या दहशतवादी संघटनेचा गड मानला जात होता. याच मतदारसंघात रैना आपले नशीब आजमवत आहेत. त्या दिल्लीत एका खासगी कंपनी नोकरी करतात. तर पुलवामातील फ्रिसल या गावच्या सरपंचही आहेत. आठवले गटाच्या त्या एकमेव उमेदवार आहेत.

युवकांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढवत असल्याचे रैना यांनी सांगितले. मी सरपंच म्हणून काम करत असताना युवकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणताही दोष नसताना युवकांना त्रास सहन करावा लागत आहे. 90 च्या दशकात जन्माला आलेल्या मुलांना केवळ बंदुकीच्या गोळ्या पाहायला मिळाल्या, असे रैना यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितले.

Daisy Raina, Ramdas Athawale
Madhabi Puri Butch : माधबी बुच यांच्यावर संसदीय समिती घेणार ‘अ‍ॅक्शन’; शेअर बाजार कोसळला...

पुलवामामध्ये कोणत्याही सुरक्षेशिवाय मी काम करण्यासाठी फिरत होते. माझ्याकडे कोणतीही खासगी सुरक्षाव्यवस्था नाही. काही लोक सुरक्षा घेतात, पण मी नाही. पुलवामामध्येही अनेक वर्षांपासून काम करत आहे. मुस्लिमांकडून मला पाठिंबा मिळतो, त्यांच्याशीही मी काम केल्याचे रैना म्हणाल्या.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभेची निवढणूक होत आहे. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याआधीपासून म्हणजे 2018 पासून राज्यात राज्यपाल कारभार पाहतात. आता तीन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीनंतर राज्यात नव्या सरकारची सत्ता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com