Ramdas Athawale News: `इंडिया`त नसलेल्या मायावतींना सोबत घेण्याच्या प्रयत्न करू..

Ramdas Athawale On Mayawati: अजित पवार व शरद पवार यांच्यात संवाद होत आहे, ही चांगली बाब आहे. उद्धव ठाकरे यांनी फार त्रागा करू नये.
Ramdas Athawale-Mayawati News
Ramdas Athawale-Mayawati NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : उत्तर प्रदेशातील बसपाच्या नेत्या मायावती यांनी भाजपविरोधी आघाडी असलेल्या `इंडिया`त सहभागी न होण्याची भूमिका घेतली. (RPI News) तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणाही त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जालन्यात मायावती यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

Ramdas Athawale-Mayawati News
Imtiaz Jaleel On Co-Operative Bank: आणखी एक बॅंक बुडाली, आता तरी ग्राहकांच्या पैशाची हमी द्या..

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली जाईल, त्यानंतरच निर्णय होईल, असेही (Ramdas Athawale)आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागा तर विधानसभेच्या १२ जागा रिपाइंला सोडाव्यात, अशी भूमिकाही आठवले यांनी मांडली. (Mayawati) रामदास आठवले जालन्यात रिपाइंच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघे १५ महिने शिल्लक आहेत. (Jalna) त्यामुळे राज्यात तातडीने मंत्रीमंडळाचा विस्तार करून रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) सामाजिक न्याय मंत्रिपद द्यावे. राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी 'एनडीए' ने रिपब्लिकन पक्षाला दोन जागा सोडव्यात तर विधानसभा निवडणूकीसाठी दहा ते बारा जागा सोडाव्यात.

भाजपने कोणताही पक्ष फोडला नाही, ज्यांची ईच्छा होती ते सोबत आले आहेत. अजित पवार व शरद पवार यांच्यात संवाद होत आहे, ही चांगली बाब आहे. उद्धव ठाकरे यांनी फार त्रागा करू नये, तर संयम दाखवावा, असा सल्ला देत 'इंडिया' ची एकजूट होत असेल तर देशात एक प्रबळ विरोधीपक्ष हवा म्हणून होत आहे.

आम्ही देखील एनडीएच्या माध्यमातून निवडणुकांची जोरदार तयारी करीत आहोत. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या असल्या तर आम्ही त्यांना आमच्यासोबत येण्याचे आमंत्रण देऊ. अर्थात याबाबत भाजपचे अध्यक्ष तथा नेते ठरवतील, असे सांगत मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना निषेधार्ह आहेत, याविरोधात आम्ही आवाज उठवू, असेही आठवले यांनी नमूद केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com