Ramesh Bornare
Ramesh Bornare sarkarnama

Ramesh Bornare News : फडणवीसांच्या बैठकीला जाणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराला अडवलं ; विभागीय आयुक्तालयात राडा

Aurangabad News : "माझी गाडी का अडवतात,"

Aurangabad News : औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात आज (बुधवारी) आराखडा बैठक सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे या बैठकीला उपस्थित आहेत.

या बैठकीला शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (ramesh bornare) हे जात असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने वाद निर्माण झाला आहे. बोरनारे आणि पोलिस यांच्यात शाब्दीक वादावादी झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव होता.

या आराखडा बैठकीसाठी आमदार, जिल्हाधिकरी, पालकमंत्री उपस्थित आहेत. यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या गाडीचा चालक आणि पोलिस यांच्यात वाद झाला.

Ramesh Bornare
Pune By-Election 2023 : कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख बदलली ;या दिवशी होणार निवडणूक

यावेळी आमदार रमेश बोरनारे यांचाही पोलिसांशी वाद झाला. "सर्व आमदारांची गाडी आतमध्ये जाऊ दिली जात असताना, माझी गाडी का अडवतात," असा आरोप बोरनारे यांनी केला आहे.

"माझी गाडी जाणून-बुजून थांबवण्यात आली," असं बोरनारे यांचे म्हणणं आहे. इतर आमदारांच्या गाड्या गेल्या असताना आमच्या सोबतच असे का,असा सवाल बोरनारे यांनी पोलिस प्रशानसनाला विचारला आहे. या वादात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.

राज्यात सत्तातर झाले तेव्हा वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. "उद्धव ठाकरेसोबत असलेल्या चार बडवे यांनी शिवसेनेचे वाटोळे केले," असा आरोप त्यांनी बोरनारे यांनी केला आहे. बोरनारे हे काही दिवसांपूर्वी महालगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे त्यांचा वाद झाला होता.

Ramesh Bornare
Sanjay Raut News : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान ; म्हणाले , शिवसेनेने हि जागा ..

बोरनारे हे महालगाव येथे एका दुकानाच्या उदघाटनाला गेले होते. यावेळी त्यांनी माजी पंचायत समितीच्या सदस्यांची घरी जात भेट घेतली. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

लाठ्या-काठ्या घेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बोरनारे यांनीही शिवीगाळ केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वाद मिटला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com