Dharashiv Market Committee News : सत्ता राखण्याचे राणा पाटलांसमोर आव्हान, कैलास पाटलांनीही शड्डू ठोकला..

Kailas Patil : गेल्यावेळी राणा पाटील यांच्या गटाकडुन संचालक झालेले पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव ठाकरे गटाकडुन रिंगणात.
Dharashiv Market Committee News
Dharashiv Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : धाराशिव कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या (Market Committee) निवडणुकीच्या प्रचाराचा नाराळ आता फुटला आहे. भाजप-शिंदे गटाची युती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून राणाजगजीतसिंह पाटील यांची बाजार समितीवर राहिले आहे. आता ती कायम राखण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीने देखील शड्डू ठोकल्याने लढत चुरशीची होणार एवढे मात्र निश्चित आहे.

Dharashiv Market Committee News
High Court News : पन्नास खोके.. म्हणत ताफ्यावर कापूस फेकल्यामुळे दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) यांच्या मतदारसंघातील ही बाजारसमिती आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी देखील जोर लावला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचाराचा धुराळा उडवला जाणार आहे. (Dharashiv) बाजार समितीचे कार्यक्षेत तालुकाभरात असल्याने सोसायटीमध्ये १ हजार ८९ इतके मतदार आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघामध्ये १ हजार ९२, व्यापारी २८१ व हमाल मापाडी मतदारांची संख्या २९१ एवढी आहे.

या सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपची तालुक्यात चांगली स्थिती असली तरी (Ranajagjeetsingh Patil) शिवसेनेच्या ठाकरे गटानेही आपला गड मजबुत करण्याचा प्रयत्न केला आहे. सोसायटी मतदार संघावरच सत्तेचे गणित अवलंबुन असणार आहे, त्यामुळे सोसायटीच्या मतदारांचा चांगलाच भाव वाढणार आहे. त्यातही बिनविरोध सोसायट्याच्या संख्या अधिक असल्याने तिथे पक्षापेक्षा व्यक्तीगत पातळीवर मतदान घेण्याची स्पर्धा लागणार आहे.

अनेक गावामध्ये अराजकीय लोक सदस्य असल्याने त्याचा कल कसा राहणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबुन असणार आहेत. सध्यस्थितीला बाजारसमिती निवडणुकीत विद्यमान संचालकाची संख्या कमी आहे. भाजपकडुन बाजरसमितीचे माजी सभापती दत्तात्रय देशमुख यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. गेल्यावेळी राणा पाटील यांच्या गटाकडुन संचालक झालेले पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव ठाकरे गटाकडुन रिंगणात आहेत. ठाकरे गटाने मातब्बर मंडळीना संधी देऊन निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

संग्राम देशमुख, विठ्ठल सातपुते, अंकुश मोरे अशी दिग्गज मंडळी असल्याने त्यांच्या संपर्काचा उपयोग होऊ शकतो. भाजपकडुनही राजेंद्र पाटील, निहाल काझी अशा अनुभवी मंडळीवर विश्वास टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडुन नवनाथ राऊत तर काँग्रेसकडुन राजेंद्र शेरखाने व उमेश राजेनिंबाळकर यासारख्या मातब्बर लोकांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचा मतदार कमी असला तरी व्यक्तीगत संपर्काचा या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपच्या निवडणुकीचे नियोजन पुर्णपणे आमदार राणा पाटील यांच्याकडे असणार आहे. तर महाविकास आघाडीचे नेतृत्व आमदार कैलास पाटील करताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com