Raosaheb Danve : इम्तियाजजी तुमची आणि आमची दोस्ती पक्की आहे, तुम्ही भाजपचेच वाटतात..

यापुढे इम्तियाज जलील जेव्हा तुम्ही भाषण कराल तेव्हा या गोष्टी मोदी सरकारच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्या हे सांगायला विसरू नका. (Minister Raosaheb Danve)
Minister Raosaheb Danve-Mp Imtiaz Jalil News, Aurangabad
Minister Raosaheb Danve-Mp Imtiaz Jalil News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या बाबतीत आपण कसे मागसलेलो आहोत हे सांगितले. पण त्यांना मी सांगू इच्छितो आपला हा मराठवाड्याचा भाग ब्रिटीशांच्या नाही, तर निजामाच्या अधिपत्याखाली होता. निजामाला रेल्वेची गरज नव्हती, त्यामुळे निझामामुळेच या भागाचा विकास होऊ शकला नाही, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या भाषणाचा उल्लेख करत लगावला.

तुमची आणि आमची दोस्ती पक्की आहे, तुम्ही आहात एमआयएमचे पण वाटतात भाजपचे, असा चिमटा काढत धमाल उडवून दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत (Aurangabad) औरंगाबाद येथील रेल्वे पीटलाइन आणि रेल्वेस्थानकाच्या नुतीनकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सगळ्या पक्षांचे मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते. खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मराठवाड्यातील रेल्वे विकास रखडण्याची कारणे रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली. रावसाहेब दानवे म्हणाले, मराठवाड्याचा हा भाग निजामाच्या राजवटीखाली होता, निजामाला रेल्वेची गरज भासत नव्हती, म्हणूनच इथे विकास होऊ शकला नाही. त्यामुळे याला निझामच जबाबदार होता. इम्तियाज जलीलजी तुम्ही गेल्या तीन वर्षापासून ज्या मागण्या लोकसभेत रेल्वेच्या संदर्भात करत आहात, त्या आम्ही गेल्या २५ वर्षांपासून करत आहोत.

रेल्वेच्या प्रमुख तीन मागण्या काय होत्या? तर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि हा भाग दक्षिण मध्य रेल्वेतून काढून मध्य रेल्वेला जोडणे. पैकी दोन मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुर्ण केल्या आहेत. येत्या २०२३ पर्यंत देशातील बहुतांश रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पुर्ण होऊन त्या धावू लागतील. दुहेरीकरणाचे काम देखील झपाट्याने सुरू आहे. राहिला मध्य रेल्वेत समावेश करण्याचा तर ते देखील लवकरच होईल.

Minister Raosaheb Danve-Mp Imtiaz Jalil News, Aurangabad
BJP : अजितदादांनी, सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न बघू नये ; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोमणा

तेव्हा यापुढे इम्तियाज जलील जेव्हा तुम्ही भाषण कराल तेव्हा या गोष्टी मोदी सरकारच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्या हे सांगायला विसरू नका. मोदी सरकारच्या काळात कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी ११ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे महसुल मिळत नाही, म्हणून औरंगाबाद किंवा मराठवाड्याचा रेल्वे विकास थांबला असे आता होणार नाही.

सुदैवाने मराठवाडा आणि औरंगाबादला अनेक मंत्री मिळाले आहेत. त्यामुळे येत्या २०२३ पर्यंत आपण रेल्वे विकासाच्या बाबतीत नाशिक, पुणे, ठाण्याच्या बरोबरीत असू, असा दावा देखील दानवे यांनी केला. जालना आणि औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी रेल्वे मंत्र्यांनी अनुक्रमे १७० व १८० कोटी दिल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com